शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

‘गोंडवाना’च्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:21 IST

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी रात्री उशीरापर्यंत पार पडली. या सभेत अनेक सिनेट सदस्यांनी विद्यापीठाने खरेदी केलेल्या जमिनीच्या गैरव्यवहाराच्या मुद्यावर आक्षेप घेत रान उठविले.

ठळक मुद्देपाच सदस्यीय समिती गठीत : अधिसभेत जमीन खरेदीच्या मुद्यावर वादळी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाची अधिसभा कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी रात्री उशीरापर्यंत पार पडली. या सभेत अनेक सिनेट सदस्यांनी विद्यापीठाने खरेदी केलेल्या जमिनीच्या गैरव्यवहाराच्या मुद्यावर आक्षेप घेत रान उठविले. सदर मुद्यावर या अधिसभेत जमीन खरेदीच्या गैरव्यवहार प्रकरणावर बराच वेळ चर्चा झाल्यामुळे ही सभा लांबली. त्यामुळे जमीन खरेदी गैरव्यवहाराची चौकशी आता पाच सदस्यीय समितीमार्फत करण्यात येणार आहे.विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ इमारत व इतर विकासात्मक कामे करण्यासाठी आरमोरी मार्गावरील अडपल्ली नजीक ४.१५ हेक्टर जमीन खरेदी केली. या खरेदीवर काही सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन मंडळातील सदस्यांचा आक्षेप आहे. या जमीन खरेदीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. महामार्गालगतच्या व दूरच्या जमिनीला सारखाच भाव देण्यात आल्याचे मुख्य कारण आहे. रस्त्यालगतची जमीन व त्याच्या मागील जमिनीचा भाव सारखाच कसा असू शकतो, असा प्रश्न सिनेट सदस्य प्रा. प्रमोद शंभरकर यांच्यासह शिक्षण मंच व अभाविपच्या अनेक सिनेट सदस्यांनी या अधिसभेत उपस्थित केला. दरम्यान या मुद्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये आमदार डॉ. देवराव होळी, सिनेट सदस्य डॉ. प्रमोद शंभरकर, गोविंद सारडा, देवेश कांबळे व अजय बदकमवार यांचा समावेश आहे. आता ही समिती जमीन खरेदी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून विद्यापीठाला अहवाल सादर करणार आहे.याशिवाय प्रश्नपत्रिका मूल्यांकनाच्या कामासाठी बंद केलेला वाहन भत्ता सुरू करण्यात यावा, प्रत्येक विषयाचा प्रश्नकोष तयार करावा, स्वतंत्र आदिवासी साहित्य व गोंडी भाषा अभ्यास तसेच संशोधन केंद्र सुरू करावे, आदी विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.पत्रकारांना सभेत बसण्याची मुभागोंडवाना विद्यापीठ विकासाच्या प्रक्रियेत पत्रकार चांगली भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध विकासात्मक व इतर बाबींचे वृत्त संकलन करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेच्या सभेत पत्रकारांना बसू देण्यात यावे, असा मुद्दा सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी बैठकीत उपस्थित करून तसा प्रस्ताव ठेवला. यावर सदर प्रश्न सभा अध्यक्षांनी मान्य केला. विद्यापीठाच्या निर्देशानुसार, पत्रकारांना सभेमध्ये बोलाविण्याचे निर्देश नाहीत. मात्र पत्रकारांना सभेमध्ये यायचे असल्यास ते येऊ शकतात, असे उत्तर सभाध्यक्षांनी दिले.रोजगार व स्वयंरोजगारावर अभ्यासक्रम हवेविद्यापीठाच्या पारंपरिक अभ्यासक्रमातून गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात बेरोजगारांच्या फौजा निर्माण होत आहेत. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करणारे अभ्यासक्रम सुरू करावेत, असा प्रस्ताव सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर यांनी या सभेत ठेवला. बांबू तंत्रज्ञानावरील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, सौरऊर्जा तंत्रज्ञानावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त बॅचलर आॅफ व्होकेशनल आदी रोजगार निर्मितीवर भर देणारे अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे येलेकर यांनी सुचविले. सदर दोन्ही ठराव अधिसभेत सर्वानुमते संमत करण्यात आले. या दोन्ही ठरावाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन सभाध्यक्षांनी सभागृहात दिले.

टॅग्स :universityविद्यापीठ