शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठात ‘बार्टी’चे स्पर्धा परीक्षा केंद्र मंजूर

By दिलीप दहेलकर | Updated: September 26, 2023 17:10 IST

मोठ्या शहरातील तज्ज्ञ गडचिरोलीत देणार विद्यार्थ्यांना परीक्षेचे धडे

गडचिरोली : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र येथील गोंडवाना विद्यापीठाला मंजूर झाले आहे. एमपीएसी परीक्षेच्या सर्व विषयाचे तज्ज्ञ गडचिरोली येथे अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बँक (आयबीपीएस), रेल्वे, एलआयसी व तत्सम्‌ स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सदर परीक्षा केंद्र व कोचिंगमुळे गडचिरोलीसारख्या मागास जिल्हयातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनून प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना बँक (आयबीपीएस), रेल्वे, एलआयसी व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या निशुल्क पूर्वप्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज बार्टीच्या संकेतस्थळावर अर्ज भरणे अनिवार्य आहे. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असून, याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या तसेच ‘बार्टी’च्या संकेतस्थळावर आहे. विद्यापीठ आणि ‘बार्टी’मध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालविण्याबाबत सामंजस्य करार झाला आहे. याअंतर्गत हे केंद्र मंजूर झाले आहे. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या सहकार्याने ही कार्यवाही पूर्ण झाली. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठात ही संधी मिळाली आहे.

स्पर्धा परीक्षेचे निशुल्क कोचिंग विद्यापीठाच्या क्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या २०० विद्यार्थ्यांना सहा महिन्याचे मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळणार आहे. यामध्ये १५० विद्यार्थी बॅकींग व ५० विद्यार्थ्यांना एमपीएसी परीक्षेचे काेचिंग मिळणार आहे. सदर विद्यार्थ्यांना सहा महिने महिन्याला सहा हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे.

सदर प्रशिक्षण पूर्णतः निःशुल्क असून, प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च बार्टी पुणे मार्फत केला जाणार आहे. इच्छूक प्रशिक्षणार्थीच्या प्राप्त अर्जांमधून निकषांच्या आधारे अर्जांची छाननी करून उमेदवारांना प्रवेश दिला जाणार आहे. बार्टीच्या या स्पर्धा परीक्षा केंद्रामुळे चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना एमपीएसी परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. 

- डॉ. अनिल हिरेखण, कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली.

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठGadchiroliगडचिरोली