शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेणखताला सोन्याचे दिवस, शेतात १ ट्रॅक्टर टाकायला मोजा २ हजार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:57 IST

Gadchiroli : पशुधन घटल्याने आता शेणखताला सोन्याचे दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : आधीच दुष्काळी परिस्थिती, त्यात पशुधन घटल्याने आता शेणखतालाही सोन्याचे दिवस आले आहेत. शेतीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या शेणखताचे दर प्रतिट्रॅक्टर ट्राली दोन हजार रुपयांपर्यंत वाढल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. शेतीसाठी लागणारे शेणखत महागल्याने जमिनीचा पोत टिकवून ठेवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

शेतकऱ्यांकडील पशुधन पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याने शेतीमध्ये शेणखताचा वापर कमी झाला आहे. परिणामी, रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावत चालला आहे. सद्यःस्थितीत दोन हजार ट्रॉलीने खत मिळत आहे. ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला. सध्या उन्हाचा कडाका, तर दुसरीकडे शेतकरी रब्बी संपवून शेती मशागत करून खरिपाची तयारी करीत आहेत. सध्या शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेणखत टाकण्याच्या धावपळीत आहेत. जनावरांची संख्या कमी झाल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. पैसे देऊनही चांगले शेणखत मिळत नसल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत.

जमिनीला रासायनिक खतांचा अतिरेक होत असून, वर्षभरात दोन पिके घेतली जातात. त्यामुळे जमीन कसदार राहण्यासाठी शेणखत उपयुक्त आहे. मात्र, पशुधनाची संख्या कमी झाल्यामुळे शेणखताची टंचाई निर्माण होत आहे. तालुक्यातील काही मोजके शेतकरी सेंद्रीय शेती करताना दिसून येत आहेत. खरीप हंगामात तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सेंद्रीय पद्धतीने शेती करून धानाचे उत्पादन घेतले.

वाढत्या किमतीमुळे शेतकरी जनावरे पाळणे बंद केल्याने जनावराची संख्या कमी झाली आहे. शेणखतही दुर्मीळ होत असून चांगले शेणखत मिळत नाही. पर्याय नसल्याने रासायनिक खत वापरावे लागते. त्यामुळे जमिनीचा दर्जा, पोत घसरत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होत आहे.- विश्वनाथ सोमनकर, शेतकरी, चामोर्शी

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती