शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

जिल्हावासीयांना उद्या देव पावणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

संकटकाळात मानसिक आधार ठरणारी सर्वच धार्मिक स्थळे, कार्यक्रम बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह भक्तमंडळींना घरी बसूनच मनोमन आपली भक्ती पूर्ण करावी लागली. काही दिवसांपूर्वी भाजपने यासाठी आंदोलनही केले. पण, कोरोनाला रोखण्यासाठी जोखीम पत्करणे योग्य नसल्याचे सांगत शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही. आता राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने देवालये उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल दीड वर्षाच्या कोरोनाकाळात काही दिवसांचा अपवाद वगळता बंदच असलेली मंदिरे गुरुवार, ७ ऑक्टोबरपासून उघडली जाणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात तो आदेश लागू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर केलेला नसला तरी बुधवारी हा निर्णय आणि त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. संकटकाळात मानसिक आधार ठरणारी सर्वच धार्मिक स्थळे, कार्यक्रम बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह भक्तमंडळींना घरी बसूनच मनोमन आपली भक्ती पूर्ण करावी लागली. काही दिवसांपूर्वी भाजपने यासाठी आंदोलनही केले. पण, कोरोनाला रोखण्यासाठी जोखीम पत्करणे योग्य नसल्याचे सांगत शासनाने मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही. आता राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने देवालये उघडण्यास परवानगी देण्यात येत आहे. 

मंदिरात जाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे भाविकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. शक्यतोवर कोरोना प्रतिबंधक दोन लस घेतलेल्या नागरिकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. ते नागरिकांच्या हिताचे राहील.कोणत्याही परिस्थितीत मंदिरात गर्दी करणे टाळावे, एकमेकांपासून विशिष्ट अंतर ठेवूनच दर्शन घ्यावे. मास्कचा वापर आवर्जून करावा.

मार्कंडेश्वर देवस्थान समितीची तयारी

-   जिल्ह्यातील सर्वाधिक भक्तांची गर्दी खेचणाऱ्या श्री मार्कंडेश्वर मंदिर कमिटीकडून दारे उघडण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्याबाबत जिल्हाधिकारी आणि भारतीय पुरातत्त्व विभागाकडून आदेश आलेला नाही. तो मिळाल्यानंतर मंदिर ७ ऑक्टोबरपासून उघडले जाणार आहे.

-    मंदिरात दर्शनासाठी येताना कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. भाविकांनी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक राहणार आहे, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

दीड वर्षानंतर देव घेणार मोकळा श्वासईश्वरासाठी त्याचे भक्तच सर्वाधिक प्रिय असतात, असे म्हणतात. पण, जवळपास दीड वर्ष भक्त आणि ईश्वरात कोरोनाने दुरावा निर्माण केला होता. तो दुरावा आता दूर होत असल्यामुळे भक्तांसोबत देवालाही दिलासा मिळणार आहे. अनेक दिवस मंदिरात बंदिवासात असलेले देव आता मोकळा श्वास घेतील.

 

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या