शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

शिक्षकांना एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

 दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांना चटोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार वरिष्ठ वेतनश्रेणी योजनेचा लाभ मिळाल्यामुळे एकस्तर वेतनश्रेणीनुसार सुरू असलेले वेतन बंद केल्याने कार्यरत शिक्षकांवर अन्याय होत आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त आहे. या क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार गट अ ते ड च्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ मिळावयास पाहिजे होता.

ठळक मुद्देप्राथमिक शिक्षक समितीची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शिक्षक संवर्गास सेवांतर्गत आश्वासित योजना लागू नसल्याने चटोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरीनंतर पुनश्च एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गडचिरोलीच्या वतीने राज्याचे ईमाव बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.  दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांना चटोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार वरिष्ठ वेतनश्रेणी योजनेचा लाभ मिळाल्यामुळे एकस्तर वेतनश्रेणीनुसार सुरू असलेले वेतन बंद केल्याने कार्यरत शिक्षकांवर अन्याय होत आहे. संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त आहे. या क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार गट अ ते ड च्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ मिळावयास पाहिजे होता. परंतु, ज्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे, त्या कर्मचाऱ्यांचा एकस्तरचा लाभ कमी करून वरिष्ठ वेतनश्रेणीप्रमाणे लाभ देण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रक काढले असून, एकस्तर अतिप्रदानच्या नावाखाली वसुली प्रस्तावित केली आहे. या प्रकरणात जातीने लक्ष घालून शासन स्तरावर ग्रामविकास विभाग, सामान्य प्रशासन विभाग व संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित करून न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार,  कुरखेडा तालुकाध्यक्ष खिरेंद्र बांबोळे, आरमाेरी तालुकाध्यक्ष जीवन शिवणकर, उपाध्यक्ष सुनील चरडुके, आदी उपस्थित होते. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच संबंधित विभागाच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणी लाभ मिळवून देण्यास व अतिप्रदान रकमेची वसुली थांबविण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

पदवीधर वेतनश्रेणीपासून शिक्षक वंचितइयत्ता ६ ते ८ या वर्गांना शिकविणाऱ्या गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, मराठी या विषय संवर्गाच्या विषय शिक्षकांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदवीधर प्राथमिक शिक्षकाची वेतनश्रेणी मंजूर करण्यात यायला पाहिजे होती. मात्र, अनेक शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली नसल्याची बाब मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात आणून देण्यात आली. याबाबतही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयाेजित करण्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले.

 

टॅग्स :Teacherशिक्षकVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार