गडचिरोली : शहरातील गोकुलनगर प्रभाग सहामध्ये अतिक्रमण करून अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पट्टे देण्यात यावे, अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गोकुलनगरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये शौचालय बांधकामाची समस्या, घरकूल, रस्ते, नाल्या, पथदिवे आदी समस्या आहेत. अतिक्रमण धारकांकडे पट्टे नाहीत. परिणामी नागरिकांना अनेक योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना प्रशासनाने पट्टे प्रदान करावे, अशी मागणी काँगे्रेस कमिटीच्या रोजगार सेलतर्फे करण्यात आली आहे. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर नगर परिषदेकडे समस्या मांडण्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्याध्याधिकाऱ्यांची भेट घेतली. मुख्याधिकाऱ्यांनी न. प. च्या अभियंत्र्यांना पाठवून गोकुलनगरातील समस्या जाणून घेण्यास सांगितले. त्यामुळे येथील समस्या मार्गी लागण्याची नागरिकांना आशा आहे.
अतिक्रमणधारकांना पट्टे द्याजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गोकुलनगरातील नागरिकांची मागणी
By admin | Updated: August 15, 2015 00:20 IST