शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

घरकूल रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

चामाेर्शी : कोरोनामुळे यावर्षी बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले आहे. अनेकांनी घर बांधकाम करण्याचा बेतही पुढे ढकलता आहे. मात्र जे ...

चामाेर्शी : कोरोनामुळे यावर्षी बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले आहे. अनेकांनी घर बांधकाम करण्याचा बेतही पुढे ढकलता आहे. मात्र जे बांधकाम सुरू आहे. त्यामध्ये मजुरांना अत्यल्प मजुरी दिली जात असल्यामुळे मजुरी वाढवून देण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा

आरमाेरी : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ग्रामीण भागातील घरकूल बांधकाम रखडले

देसाईगंज : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शेकडो नागरिकांना घरकूल मंजूर झाले. परंतु पंचायत समितीच्या नियोजनामुळे धनादेश मिळाले नाहीत. शेकडो लाभार्थी घरकुलासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र, धनादेश मिळाला नाही. काही व्यक्तींची नावे चुकीने वगळण्यात आली. दरम्यान, कोरोनामुळे टाळेबंदी लागल्याने प्रशासकीय कामे ठप्प झाली. त्यामुळे घरकूल बांधकाम निधीअभावी रखडली आहेत.

रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा कोलमडली

एटापल्ली : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे़ बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे़ आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयात जाणे शक्यच नाही़ शासनाकडून आरोग्य केंद्रांना मोठा निधी दिला जात आहे़ पण, मूलभूत सुविधा मिळत नसल्याने रुग्ण हैराण झाले आहेत.

वाहनधारकांना शिस्त लावणे गरजेचे

गडचिराेली : शहराची मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चाैकात असून अनेक दुकाने आहेत. परंतु काही ग्राहक स्वत:ची वाहने पार्किंगमध्ये न ठेवता रस्त्यावरच लावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. संबंधित विभागाने रस्त्यावरील पार्किंग हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासाठी निवेदनही दिले आहे. मात्र उपाययोजना करण्यात आली नाही.

ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

धानाेरा : जंगलव्याप्त ग्रामीण भागात वन्यप्राणी धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर जागून शेताचे रक्षण करावे लागत आहे. त्यातच वाघ-बिबटसारख्या हिंस्र प्राण्यामुळेही शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे त्यांना शेतातील कामे करणेही कठीण झाले आहे. त्यावर उपाय करण्याची मागणी केली आहे.

नाल्यातील गाळ काढण्याची मागणी

गडचिराेली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात. त्यामुळे दुरुस्ती करून गाळ काढण्याची मागणी केली जात आहे.

शासकीय योजनेपासून बचतगट वंचित

काेरची : ग्रामीण भागातील पुरुष व महिला बचतगटाच्या माध्यमातून प्रगती साधत आहेत. त्यांच्याकरिता शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे. या माध्यमातून विकासाची दालने खुली झाली आहेत. परंतु शासकीय योजनेपासून बचतगट वंचित आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

डुकरांच्या बंदोबस्ताची मोहीम थंडावली

गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. माेकळ्या जागेत डुकर दिवसभर बसून हैदाेस माजवितात.

रस्त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी

आरमाेरी : करोडो रुपये खर्च करून रस्त्यांचे बांधकाम करण्यात येते. मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे बांधकाम करीत असल्याने अल्पावधीतच रस्ता उखडत असल्याने शासनाला मोठा फटका बसत असतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी रस्त्याची गुणवत्ता तपासण्यात यावी, रस्त्याची दुरवस्था झाल्यास कंत्राटदाराला दोषी ठरवून त्याच्याकडून भरपाई घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

स्पर्धा परीक्षेचे वर्ग भरविण्याची मागणी

चामाेर्शी : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना युवकांसाठी लॉकडाऊनमध्ये बार्टीतर्फे माेफत स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेण्यात आले. याचा अनेक गरजंवतांना फायदा झाला. अशा प्रकारचे वर्ग पुन्हा भरविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षेचे स्वरूप बदलत आहे. शहरात याबाबत शिकवणी वर्गातून माहिती मिळते. मात्र ग्रामीण भागातील युवकांकडे अशी कुठल्या प्रकारची व्यवस्था राहत नसल्याने त्यांना अडचण जात आहे.

एसटीचे तिकीट कमी करण्याची मागणी

अहेरी : लाॅकडाऊननंतर आता एसटी सुरू झाली आहे. मात्र तिकीट जास्त असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीचे तिकीट कमी करण्याची मागणी केली जात आहे.

स्वच्छता मोहीम गतिमान करावी

आष्टी : शहरातील प्रत्येक वाॅर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पडू शकतो. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर आळा घाला

कुरखेडा : शहरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक दहशतीत आहेत. अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बंदी घालणे गरजेचे आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा

घाेट : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

एटापल्लीत डासांचा प्रादुर्भाव वाढला

एटापल्ली : मागील काही दिवसांपासून डास व कीटकांचा त्रास वाढला आहे. अनेकदा रात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने डासांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे फवारणी करण्याची मागणी केली आहे.

नियमित लाईनमन नसल्याने त्रास

काेरची : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाईमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. ग्रामीण भागामध्ये वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

नागरिकांना अद्यापही रस्त्यांची प्रतीक्षा

वैरागड : रस्त्यामुळे गावाचा विकास होतो. मात्र पक्के रस्तेच नसल्यास विकास खुंटतो. तालुक्यातील काही रस्ते पक्के नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावागावांतील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कमलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. असे असतानाही काही किराणा दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स न पाळता जीवनावश्यक साहित्याची खरेदी केली जात आहे. त्यामुळे वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. याकडे दुकानदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.