शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

शुद्ध व थंड पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:59 IST

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी महिला सबलीकरण कार्यक्रमांतून श्रम साफल्य साधन केंद्र चामोर्शी अंतर्गत मार्र्कंडादेव येथे शुद्ध व थंड पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाविमचा पुढाकार : मार्र्कंडादेव येथे वॉटर एटीएम कार्यान्वित

ऑनलाईन लोकमतमार्र्कंडादेव : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तेजस्वीनी महिला सबलीकरण कार्यक्रमांतून श्रम साफल्य साधन केंद्र चामोर्शी अंतर्गत मार्र्कंडादेव येथे शुद्ध व थंड पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतून येथे वॉटर एटीएम सुरू करण्यात आले आहे. या वॉटर एटीएममधून पाच रूपये किमतीत नागरिकांना एक लिटर शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.सदर वॉटर एटीएम संत गाडगेबाबा कचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्र्कंडादेवच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय आवारात बसविण्यात आले आहे. जवळपास एक लाख रूपये किमतीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. सदर वॉटर एटीएम ही २०० लिटर क्षमतेची आहे. सदर एटीएमवर पाणी टाकी बसविण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठयात सातत्य राहिल. सदर वॉटर एटीएमचा शुभारंभ सरपंच उज्वला गायकवाड, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव मृत्यूंजय गायकवाड, ग्रा.पं. सदस्य सुनिता म्हरस्कोल्हे आदी उपस्थित होते.तासाला ५० लिटर पाणी उपलब्ध होणारमार्र्कंडादेव येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रकल्पातून एका तासाला ५० लिटर शुध्द व थंड पाणी उपलब्ध होणार आहे. दिवसभरात एक ते दीड हजार लोकांना पाणी उपलब्ध होईल. या प्रकल्पातून बचत गट व ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आहे. महिलांना रोजगारही मिळणार आहे. जत्राकाळात या उद्योगास भरभराटी मिळेल, अशी माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक कांता मिश्रा यांनी लोकमतशी बोलताना दिली.