शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

'यू-डायस प्लस'मध्ये गडचिरोलीचा राज्यात डंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:53 IST

Gadchiroli : १,९९० शाळांची माहिती १०० टक्के ऑनलाइन

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भारत सरकार यू-डायस प्लसच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांकडून माहिती प्राप्त करून घेत असते. प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टल तसेच टीचर पोर्टल आणि स्टुडंट पोर्टल या तीन पोर्टलमध्ये जिल्ह्यातील एकूण १,९९० शाळांची माहिती १०० टक्के ऑनलाइन भरण्यात आली असून, यू-डायस प्लसच्या तीनही पोर्टलमध्ये गडचिरोली जिल्हा राज्यात अव्वल स्थानी आहे.

यू-डायस प्लस हे भारत सरकारचे पोर्टल आहे. देशातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे शैक्षणिक मूल्यांकन करणे आणि त्याचबरोबर राज्याचे शैक्षणिक निर्देशांक ठरवणे, समग्र शिक्षा अंतर्गत विविध योजनांचा समावेश समावेश करणे आणि त्या योजना राबविणे, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक देणे, गणवेश देणे, त्याचबरोबर शाळांना अनुदान देणे, तसेच शाळांमध्ये वेगवेगळ्या भौतिक सुविधा प्रदान करणे, आयसीटी लॅब देणे या सर्व बाबींसाठी भारत सरकार यू-डायस प्लसच्या माध्यमातून शाळांची माहिती ऑनलाइन पद्धतीने संकलित केली जाते.

सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांकडून माहिती प्राप्त करून घेत असते. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे पोर्टल सुरू आहे आणि या पोर्टलमध्ये प्रोफाइल अँड फॅसिलिटी पोर्टल, तसेच टीचर पोर्टल आणि स्टुडंट पोर्टल या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांची माहिती ऑनलाइन संकलित करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये गडचिरोली जिल्हा सद्यःस्थितीमध्ये टॉपवर असून सर्वत्र कौतुक होत आहे. 

अपार आयडी तयार करून घ्यावी जि. प. शिक्षण विभागाच्यावतीने सध्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करण्याचे काम सुरू आहे. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, तालुकास्तरीय यंत्रणेने तातडीने अपार आयडी तयार करून घ्यावे. तसेच काही अडचण असेल तर जिल्हा संगणक प्रोग्रामरशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्रा.) बाबासाहेब पवार व शिक्षणाधिकारी (मा.) वासुदेव भुसे यांनी केले आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, एम. आय. एस. कॉर्डिनेटर आणि गट साधन केंद्रातील साधन व्यक्ती या सर्वांनी अत्यंत मेहनतीने हे काम पूर्ण केलेले आहे. सर्वाच्या प्रयत्नामुळे आज गडचिरोलीसारखा अतिदुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त, दळणवळणाच्या सोयी नसलेल्या जिल्ह्याने संपूर्ण राज्यामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे. निश्चितच ही कौतुकाची बाब आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली