शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील युवकाची झेप; गडचिरोलीकर हितेश होणार भारतीय हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 11:49 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सीडीएस (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत देशातून चौथ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून रुजू होईल.

ठळक मुद्देदेशातील १३ जणांमध्ये चौथ्या क्रमांकाने निवड

एटापल्ली/चामोर्शी (गडचिरोली) : देशात मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच्या मातीत जन्म घेतलेला हितेश सोनटक्के हा युवक आता भारतीय हवाई दलाच्या फायटर प्लेनमधून आकाशात उंच झेप घेणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सीडीएस (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षेत देशातून चौथ्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला आहे. हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ म्हणून रुजू होईल.

हितेशने बी.टेक. (सिव्हिल) ही पदवी घेतली आहे. शालेय जीवनापासूनच त्याच्यावर भारतीय वायुसेनेचा प्रभाव होता. बारावीनंतर तो ‘एनडीए’ची परीक्षाही उत्तीर्ण झाला होता, पण मुलाखतीत त्याला अपयश आले. मात्र त्यामुळे खचून न जाता त्याने बी.टेक. पूर्ण केल्यानंतर ‘सीडीएस’ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करत आपले ध्येय गाठले. भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून रुजू होणारा हितेश गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव आहे. त्यामुळे तो सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. हितेश हा मालेर चक येथील प्रतिष्ठित व्यापारी, श्रीराम राईस मिलचे मालक जनार्धन कुकडे यांचा नातू (मुलीचा मुलगा) आहे.

छोट्याशा गावात जन्म, नागपूर-पुण्यात शिक्षण. मोर्शी तालुक्यातील मालेर चक (कुनघाडा रै.) या छोट्याशा गावी आपल्या मामाकडे जन्म झालेल्या हितेशचे गाव एटापल्ली आहे. त्या गावात त्याचे वडील मुरलीधर सोनटक्के यांचे मेडिकल स्टोअर आहे. गावात कॉन्व्हेंट नसल्याने त्यांनी हितेशला घोट येथील महात्मा गांधी कॉन्व्हेंटमध्ये टाकले. चौथ्या वर्गापर्यंत तिथे शिक्षण झाल्यानंतर दहावी-बारावीचे शिक्षण नागपूर येथे घेतले. दोन्ही परीक्षेत त्याला ९५ टक्के गुण होते. त्यानंतर पुणे येथील एमआयटी काॅलेजमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. यादरम्यान त्याने एनसीसीच्या एअर विंगमधून ‘सी’ सर्टिफिकेट परीक्षाही उत्तीर्ण केली. स्किट शूटिंगमध्ये तो देशभरातील कॅडेट्समध्ये पहिला आला होता.

टॅग्स :Educationशिक्षणDefenceसंरक्षण विभागindian air forceभारतीय हवाई दलGadchiroliगडचिरोली