शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

जवानाचा बळी घेणाऱ्या दोन जहाल माओवाद्यांना अटक, माजी सभापतींच्या हत्येतही सहभाग

By संजय तिपाले | Updated: March 5, 2025 19:42 IST

Gadchiroli News: भामरागड तालुक्यातील कियेर गावात माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांच्या हत्या प्रकरणासह दिरंगी- फुलनार जंगलात चकमकीत सी- ६० जवान महेश नागुलवार या जवानाचा बळी घेताना झालेल्या चकमकीत सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना पोलिसांनी आरेवाडा जंगलात अटक केली.

- संजय तिपालेगडचिरोली - भामरागड तालुक्यातील कियेर गावात माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी यांच्या हत्या प्रकरणासह दिरंगी- फुलनार जंगलात चकमकीत सी- ६० जवान महेश नागुलवार या जवानाचा बळी घेताना झालेल्या चकमकीत सक्रिय सहभाग असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना पोलिसांनी आरेवाडा जंगलात अटक केली. ५ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली.

कंपनी क्र. १० चा प्लाटून पार्टी कमिटी मेंबर केलू पांडू मडकाम उर्फ दोळवा (२६,रा. मुरकुम ता. उसूर जि. बिजापूर, छत्तीसगड) व भामरागड दलमची सदस्य रमा दोहे कोरचा उर्फ डुम्मी (३२,रा. मेंढरी ता. एटापल्ली ) अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांवर शासनाचे ८ लाखांचे बक्षीस होते. छत्तीसगड सीमेवरील कियेर येथे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी (४७) यांची १ फेब्रुवारीला गळा दाबून हत्या करत माओवाद्यांनी त्यांच्या मृतदेहावर पत्रक सोडले होते. दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी दिरंगी- फुलनार जंगलात पोलिस व माओवाद्यांत चकमक झाली होती. यात महेश नागुलवार या जवानाने माओवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या दोन्ही प्रकरणांत या दोघांचा सक्रिय सहभाग होता. भामरागड तालुक्यातीलल आरेवाडा जंगल परिसरामध्ये ते दोघे फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिस पथक व सीआरपीएफच्या ३७ बटालियनचे जवान यांनी संयुक्त मोहीम राबवून त्यांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले.

विशेष पोलिस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव दलाचे २७ बटालियनचे कमांडंट दाओ इंजिरकान कींडो, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश, उपअधीक्षक विशाल नागरगोजे व अमर मोहिते यांच्या मागर्दशनाखाली ही कारवाई केली.

गुन्हे कारकीर्द अशीकेलू पांडू उर्फ दोळवा हा २०१६ पासून माओवादी चळवळीत आहे. पामेड दलममधून त्याने सदस्य म्हणून भरती होत कारकीर्दीला सुरुवात केली. छत्तीसगड सीमेवरील चकमकीत त्याचा सक्रिय सहभाग होता. चकमकीचे ४ तर जाळपोळ व खुनाच्या दोन गुन्ह्यांत तो सामील होता.

रमा दोहे उर्फ डुम्मी ही २०११ मध्ये चेतना नाट्यमंचशी जोडली गेली व २०१३ ते २०२३ या दरम्यान गट्टा दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. सध्या ती भामरागड दलममध्ये काम करायची. ८ चकमकी, ६ खुनांत सहभागी असल्याचा तिच्यावर आरोप आहे.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली