शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जहाल माओवादी 'कांताक्का', 'वारलू'चे आत्मसमर्पण, दोघांवर १८ लाखांचे होते बक्षीस

By संजय तिपाले | Updated: February 27, 2025 20:43 IST

Gadchiroli Naxal News: तब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत  जहाल महिला माओवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (३०) या दोघांनी २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.

- संजय तिपाले गडचिरोली - तब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत  जहाल महिला माओवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलु ईरपा मज्जी (३०) या दोघांनी २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. कांतक्कावर १६ तर सुरेशवर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते, पुनर्वसनानंतर आता त्यांना अनुक्रमे साडेआठ लाख व साडेचार लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. ११ गुन्हे नोंद आहेत कांतक्कावर, तर सुरेश वारलु याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.

कांता ऊर्फ कांतक्का ही ( रा. गुडंजुर (रिट) ता. भामरागड) येथील  व  सुरेश ऊर्फ वारलु हा ( रा. मिळदापल्ली ता. भामरागड) या गावचा रहिवासी आहे. कांताक्का ही विभागीय समिती सदस्य (पुरवठा टीम) तर सुरेश वारलु हा भामरागड दलममध्ये सदस्य पदावर काम करत असे. कांताक्का हिने १९९३ मध्ये  मद्देड दलममध्ये भरती होऊन नक्षल चळवळीचा प्रवास सुरु केला. १९९८ पर्यंत ती उत्तर गडचिरोलीतील प्लाटून क्र. २ मध्ये सदस्य होती. पुढे तिची भामरागड दलममध्ये बदली झाली. २००१ मध्ये तिला उपकमांडर पदी पदोन्नती मिळाली. नंतर चातगाव दलममध्ये तिने काम केले. २००६ मध्ये तिने क्षेत्रीय समिती सदस्य म्हणून पदोन्नती मिळवली. २००८ पासून ती विभागीय समिती सदस्य म्हणून  टिपागड, चातगाव व कसनसूर दलममध्ये केएमएस (क्रांतिकारी महिला संघटन) संघटनेमध्ये २०१५ पर्यंत तिने काम केले. २०१५मध्ये तिची माड एरियातील पुरवठा टीममध्ये बदली झाली.  

सुरेश होता राजू वेलादीचा अंगरक्षक सुरेश ऊर्फ वारलु मज्जी हा २०२१ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. सप्टेंबर २०२४ पर्यंत त्याने काम केले. २०२४ मध्ये त्याची विभागीय समिती सदस्य राजू वेलादी उर्फ कलमसाय (भामरागड दलम) याचा अंगरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. 

दोन महिन्यांत २२ जणांचे आत्मसमर्पणचालू वर्षी दोन महिन्यांत आतापर्यंत २२ माओवाद्यांनी गुन्हे प्रवासाला पूर्णविराम देत आत्मसमर्पण करुन सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात केली आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान)  अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव दलाच्या १९२ बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झाले. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी