शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत पाऊस थांबला : सहा दिवसानंतर जनजीवन पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 18:34 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्यांसह इतरही तालुक्यात गेल्या सप्ताहभरापासून बरसत असलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन बुधवारी पूर्वपदावर आले.

गडचिरोली -  जिल्ह्याच्या दक्षिण भागातील चार तालुक्यांसह इतरही तालुक्यात गेल्या सप्ताहभरापासून बरसत असलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन बुधवारी पूर्वपदावर आले. भामरागडसह संपर्क तुटलेल्या गावांचे सर्व मार्ग पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.१५ आॅगस्टच्या रात्रीपासून जिल्ह्यात पाऊस बरसत आहे. सुरूवातीचे तीन दिवस दक्षिण भागातील सिरोंचा, भामरागड, अहेरी, मुलचेरा या तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातलेल्या पावसाने नंतर जिल्हा व्यापून टाकला. मंगळवारी सायंकाळपर्यंत अनेक भागात पावसाची रिमझिम सुरू होती. मंगळवारपर्यंत बहुतांश नद्या व नाल्यांचा पूर उतरला होता. मात्र भामरागडच्या पर्लकोटा नदीचा पूर कायम होता. बुधवारी सकाळपासून हा मार्गही मोकळा झाला.आठवडाभराच्या पावसामुळे दोन ठिकाणी एसटी बस व कार पुराच्या पाण्यात कोसळण्याच्या घटना घडला. सुदैवाने यात जीवित हाणी झाली नाही. अनेक भागांत एका दिवशी २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू आणि शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाच्या निर्देशानुसार नुकसानाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीRainपाऊस