शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

गडचिरोलीत पोलिसांनी दोन दिवसांत ३७ नक्षल्यांना संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 4:26 PM

नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी गडचिरोली पोलिसांनी अभूतपूर्व यश मिळवत १६ नक्षल्यांना कंठस्नान घातल्याचे दिसून आले तरी प्रत्यक्षात त्या चकमकीतील मृतांचा आकडा आता ३१ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देआतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई रविवारच्या चकमकीतील आणखी १५ मृतदेह सापडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी गडचिरोली पोलिसांनी अभूतपूर्व यश मिळवत १६ नक्षल्यांना कंठस्नान घातल्याचे दिसून आले तरी प्रत्यक्षात त्या चकमकीतील मृतांचा आकडा आता ३१ वर पोहोचला आहे. मंगळवारी राबविलेल्या शोधमोहिमेत छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीत १५ मृतदेह पोलिसांना गवसले. यासोबतच सोमवारी अहेरी तालुक्यातील नैनर परिसरात झालेल्या चकमकीत सहा नक्षली ठार झाले. त्यामुळे सलग दोन दिवसांत झालेल्या चकमकींमध्ये प्रथमच तब्बल ३७ नक्षलवादी मारल्या गेले. नक्षलविरोधी अभियानात आतापर्यंत पोलिसांना मिळालेले हे सर्वात मोठे यश ठरले आहे.छत्तीसगड सीमेजवळील ताडगावजवळच्या कसनासूर जंगलात रविवारी सकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमधे चकमक उडाली होती. ३५ ते ४० च्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांवर पोलीस भारी पडले आणि १६ जण त्याच परिसरात ठार झाले तर बाकी पळून गेले. पण त्यातील बरेच जण जखमी झाले होते. जंगलात पळून गेल्यास पोलीस हुडकुन काढतील म्हणून त्यांनी इंद्रावती नदी पार करत छत्तीसगडच्या सीमेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी अवस्थेत नदी पार करणे अनेकांना शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना पाण्यातच प्राण सोडावे लागले.सोमवारी संध्याकाळी इंद्रावती नदीत काही मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पण रात्री अंधारात शोध घेणे कठीण झाल्याने मंगळवारी पहाटेपासून स्थानिक नावाड्यांच्या मदतीने शोधमोहिम सुरू करण्यात आली. त्यात दुपारपर्यंत १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यामुळे रविवारच्या चकमकीतील मृतांचा एकूण आकडा ३१ झाला असून त्यामध्ये १५ महिला व १६ पुरूष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मदतीने सी-६० पथकाचे जवान शोधमोहीम राबवत आहेत. सायंकाळपर्यंत मृतदेहांचा आणि त्यांच्याकडील शस्त्रांचा इंद्रावती नदी आणि परिसरात शोध घेत होते.

सोमवारच्या चकमकीत सहा नक्षली ठारअहेरी तालुक्यातील राजाराम खांदलाजवळील नैनेर जंगलात नक्षलवादी व सी-६० पोलीस जवान यांच्यामध्ये सोमवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान चकमक उडाली. सदर चकमक अर्धा तास चालली. या चकमकीत एकूण सहा नक्षलवादी ठार झाले. यामध्ये चार महिला व दोन पुरूष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या चकमकीत डीव्हीसी रँकचा नक्षल कमांडर नंदू ऊर्फ वासुदेव आत्राम हा सुद्धा ठार झाला आहे. मृतांपैकी कार्तिक उईके याची ओळख पटली आहे. घटनास्थळावरून १ एसएलआर, १ इन्सास, १ थ्रीनॉटथ्री रायफल, १ मस्केट रायफल, २ बारा बोअर रायफल, पिट्टू व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी