शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षल्यांकडून दोघांची हत्या; दुर्गम भागांमध्ये परसरले भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 23:52 IST

रविवारी रात्री ७० हून अधिक नक्षलवाद्यांनी गावाला घेराव घातला

एटापल्ली/कमलापूर (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरसलगोंदी येथील दोन गावकऱ्यांची रविवारच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तसेच नक्षलवाद्यांनी कमलापूर हत्ती कॅम्पमध्येही तोडफोड केली.पिपल लिबरेशन गोरिला आर्मी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हे घडल्याने दुर्गम भागात भीतीचे वातावरण आहे. मासो डेबला पुंगाटी व ऋषी लालू मेश्राम अशी हत्या झालेल्या शेतकºयांची नावे आहेत. मासो हा पुरसलगोंदी येथील गाव पाटील आहे तर ऋषी हा कृषीमित्र म्हणून गावात काम करीत होता.रविवारी रात्री ७० हून अधिक नक्षलवाद्यांनी गावाला घेराव घातला आणि दोघांनाही झोपेतून उठवून दोघांचेही हात बांधले. त्यांच्या घरातील कागदपत्रे व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकले. दोघांच्याही कुटुंबीयांनी प्रचंड विरोध केला. मात्र त्यांना घरात कोंडून ठेवले. मारहाण करीतच त्यांना गावाबाहेर नेले. त्यानंतर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह आढळले. जवळच एक चिठ्ठी होती.या दोघांनी सुरजागड लोहप्रकल्पासाठी पैसे घेतले व ते त्या कामावर जात होते, ते पोलिसांचे खबरी होते, असा आरोप चिठ्ठीत आहे. पण मासो पुंगाटी नक्षलसमर्थक असल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. कमलापूर येथील प्रसिद्ध हत्ती कॅम्पच्या परिसरातही नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालून, तोडफोड केली. या भागात १० हत्तींचे वास्तव्य आहे.अनेक नक्षली नेते आणि दलम सदस्य पोलिसांपुढे आत्मसमर्पण करत आहेत. यातून आलेल्या नैराश्यातून नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. आदिवासींचा रोजगार हिरावण्याचा प्रयत्न नक्षलवादी करत आहेत. त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही.- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :naxaliteनक्षलवादी