शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

कसली हेलिकॉप्टर सवारी? १० किमी पायदळ वारी; बेस कॅम्पवरून जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांचे हाेतात हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:43 AM

एवढेच नाही तर एकमेकांसाेबत बाेलायचीही मुभा नसते. माेबाइल पूर्णपणे बंद ठेवावे लागतात. १० ते १२ किमी पायदळ चालल्याने कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल हाेतात.

दिगांबर जवादेगडचिराेली : जिल्हा नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. निवडणूक कालावधीत नक्षलवाद्यांकडून काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेतली जाते. त्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना बेस कॅम्पपर्यंत  हेलिकाॅप्टरने नेले जाते. त्यानंतर मात्र पोलिस संरक्षणात कित्येक किलाेमीटर पायदळ प्रवास करून मतदान केंद्र गाठावे लागते. त्यामुळे हेलिकाॅप्टरमध्ये बसण्याच्या आनंदावर काही वेळातच विरजण पडते. तब्बल १० किलोमीटरपेक्षाही अधिक पायपीट या कर्मचाऱ्यांना करावी लागते.  

४ निवडणूक कर्मचारी, २५ पोलिस जवाननिवडणूक कर्मचाऱ्यांना पाेलिसांच्या संरक्षणात नेले जाते. निवडणूक कर्मचारी चारच असतात. मात्र, त्यांच्यासाेबत जवळपास २५ पोलिस व सीआरपीएफ जवान असतात. जाे रस्ता पोलिस विभागाने ठरवून दिला त्याच मार्गाने जावे लागते. विशेष करून पथके रस्त्याने न नेता शेत किंवा जंगलातून नेली जातात. येताना पुन्हा मार्ग बदलला जाताे.

एकमेकांसोबत बोलायचीही नसते मुभा... नक्षलदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना तालुक्यावरून बेस कॅम्पपर्यंत हेलिकाॅप्टरने नेले जाते. येथपर्यंतचाच प्रवास सुखाचा असते. त्यानंतर पोलिस संरक्षणात पायदळ प्रवास सुरू हाेतो. बेस कॅम्पपासून मतदान केंद्र १० किमीपेक्षा जास्त दूर असल्यास मध्यंतरी विश्रांतीसाठी मुक्काम करावा लागतो. काही काळ विश्राम केल्यानंतर पुन्हा पुढचा प्रवास सुरू हाेतो. यादरम्यान गाेपनीयतेच्या दृष्टीने कधी निघायचे याची काहीच माहिती निवडणूक कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. एवढेच नाही तर एकमेकांसाेबत बाेलायचीही मुभा नसते. माेबाइल पूर्णपणे बंद ठेवावे लागतात. १० ते १२ किमी पायदळ चालल्याने कर्मचाऱ्यांचे चांगलेच हाल हाेतात.

दुर्गम भागातील मतदान केंद्रावर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्याला तीन ते चार दिवस बाहेर राहावे लागते. बऱ्याचवेळा प्रकृती बिघडण्याचा धोका असते. जंगलात तब्येत बिघडल्यास जीव जाण्याची शक्यता असते. तरुण व सुदृढ कर्मचाऱ्याचीच नेमणूक करावी.- जगदीश केळझरकर, निवडणूक कर्मचारी

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर