शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli: मकरसंक्रांतीचे वाण देऊन शेतात गेली अन वाघाच्या तावडीत सापडली, जिल्ह्यात १५ दिवसांत तिसरा बळी

By संजय तिपाले | Updated: January 15, 2024 22:47 IST

Gadchiroli News: मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाण देऊन हळदी- कुंकवाचा मान घेतल्यानंतर काही वेळेतच महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना मूलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथे १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली. नव्या वर्षात व्याघ्रसंकट अधिक गडद होत चालले असून १५ दिवसांतील हा तिसरा बळी आहे. 

- संजय तिपाले गडचिरोली - मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त वाण देऊन हळदी- कुंकवाचा मान घेतल्यानंतर काही वेळेतच महिलेला वाघाने ठार केले. ही हृदयद्रावक घटना मूलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथे १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता घडली. नव्या वर्षात व्याघ्रसंकट अधिक गडद होत चालले असून १५ दिवसांतील हा तिसरा बळी आहे. 

रमाबाई शंकर मुंजनकर (५५, रा. कोळसापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. सोमवारी मकरसंक्रांतीच्या सणासाठी त्या घरी होत्या. सण आटोपून त्या सायंकाळी ५ वाजता गावालगतच्या स्वतःच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या. मार्कंडा वनपरिक्षेतत्राला चिकटून शेत असून तेथे आधीच वाघ दडून बसलेला होता. या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्या मृत्युमुखी पडल्या. रात्री सात वाजेनंतरही त्या घरी न परतल्याने कुटुंबाने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. यावरून हल्ल्यांनंतर वाघाने रमाबाई मुंजनकर यांना फरफटत जंगलात नेले असावे, असा कयास बांधला जात आहे. मयत रमाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून नरभक्षक वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, मूलचेरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी चमूसह धाव घेतली. गडचिरोली, अहेरीनंतर मूलचेरातही बळीजिल्ह्यात गतवर्षी वाघाने सहा जणांचा बळी घेतला होता. यंदा १५ दिवसांत तीन बळी गेले आहेत. ३ जानेवारीला गडचिरोलीजवळील वाकडी जंगलात महिलेला ठार केले होते, ७ जानेवारीला अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे कापूस वेचताना महिलेवर हल्ला करून बळी घेतला होता तर १५ जानेवारीला मूलचेरा तालुक्यातही वाघाने महिलेस ठार मारले. त्यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष अधिक टोकाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली