शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli: भामरागड येथे निवासी शाळेला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 22:59 IST

Gadchiroli: भामरागड येथील जिल्हा परिषदेच्या समूह निवासी शाळेच्या जुन्या इमारतीला आचानक आग लागल्याची घटना २२ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली.

- रमेश मारगोनवार

भामरागड (जि. गडचिरोली) : येथील जिल्हा परिषदेच्या समूह निवासी शाळेच्या जुन्या इमारतीला आचानक आग लागल्याची घटना २२ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. या आगीत शाळेतील साहित्य जळून खाक झाले. आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यंत्रणेला यश आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

भामरागड येथील समूह निवासी शाळेच्या स्टोर रुममध्ये रात्री साडेनऊ वाजता अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाला पसरत गेल्या. काही क्षणात आगीने संपूर्ण शाळेला कवेत घेतले. धुराचे लोळ व आगीच्या ज्वाला पाहून परिसरात एकच पळापळ झाली. सुट्या असल्याने शाळेत कोणीही नव्हते. आगीत गाद्या, ब्लॅंकेट, चादरी, फर्निचर व इतर साहित्य जळून भस्मसात झाले. नगरपंचायतच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीने तिथे पोहोचला. मुख्याधिकारी प्रकाश पुपलवार आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी देखील मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक नागरिकांनी देखील आग विझविण्यासाठी मदत केली.

कारण अस्पष्टअग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. जवळच निवासी वस्ती असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आग लागल्यावर स्थानिकांची धांदल उडाली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीSchoolशाळा