शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli Naxal Attack: 'नाश्ता अर्ध्यावर सोडून तो ड्युटीवर गेला होता... परत आलाच नाही!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 10:41 IST

Gadchiroli Naxal Attack: 'नाश्ता अर्ध्यावर सोडून तो ड्युटीवर गेला होता... परत आलाच नाही!'

गडचिरोली: गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी-60 हे पथक खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 16 जवान शहीद झाले. या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात खासगी वाहन चालक असलेल्या तोमेश्वर भागवत सिंगनाथ याचाही मृत्यू झाला. सिंगनाथ याला शहिदाचा दर्जा देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सिंगनाथ यांच्या परिवाराला योग्य मदत देऊ, असं आश्वासनं पोलीस महानिरीक्षकांनी दिलं आहे.तोमेश्वर सिंगनाथ हा भरल्या नाश्त्यावरून उठून ड्युटीवर निघून गेला आणि परत आलाच नाही. तोमेश्वर हा पेशानं ड्रायव्हर आहे. तो एका लग्नाच्या वरातीत होता, त्याच दरम्यान त्याला पोलिसांचा फोन आला. पोलिसांना सकाळी 11 वाजता घेऊन जायचं असल्याचं त्याला सांगण्यात आलं. विचार करून त्यानं होकार कळवला, अशी माहिती सिंगनाथ याचा मोठा भाऊ हितेंद्र यांनी दिली आहे.नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवल्यानंतर लागलीच आम्ही घटनास्थळी पोहोचलो, असंही हितेंद्र यांनी सांगितलं आहे. हितेंद्र आणि त्याच्या वडिलांनी भाऊ तोमेश्वरची गाडी नक्षलवाद्यांनी उडवलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव रोखण्यात आलं. ते चित्र पाहिल्यानंतर हितेंद्रवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तो स्तब्ध झाला. त्यानंतर हितेंद्रच्या वडिलांनी तोमेश्वर सिंगनाथच्या मृतदेहाची ओळख पटवली.

तोमेश्वरचं लग्न झालं असून, त्याच्या पत्नीचं वय 22 वर्षं आहे. त्यांच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. तोमेश्वरचे वडील आणि भाऊ मजुरी करून पोट भरतात. तोमेश्वर हे वयाच्या 19व्या वर्षीपासून गाडी चालवतात. त्या रोडनं त्यानं बऱ्याच वेळा प्रवास केला होता. तोमेश्वरच्या जाण्यानं त्याची पत्नीसह कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरकारनंही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी