शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli: पाच जणांच्या खुनात सुनेच्या मित्राचाही सहभाग, ऑनलाईन मागवली विषारी पावडर

By संजय तिपाले | Updated: October 27, 2023 22:44 IST

Gadchiroli: अहेरी तालुक्यातील महागाव येथे सुनेने पती, सासू, सासरा, नणंदेसह पतीची मावशी या पाच जणांचा अन्नपाण्यातून विषारी द्रव देऊन खून केल्याची खळबहजनक घटना समोर आली होती.

- संजय तिपालेगडचिरोली  - अहेरी तालुक्यातील महागाव येथे सुनेने पती, सासू, सासरा, नणंदेसह पतीची मावशी या पाच जणांचा अन्नपाण्यातून विषारी द्रव देऊन खून केल्याची खळबहजनक घटना समोर आली होती. या प्रकरणात सून व पतीची मामी या दोघी सध्या पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, सुनेच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने तिला विषारी पावडर उपलब्ध करुनदिल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यास २६ ऑक्टोबरला पोलिसांनी जेरबंद केले. अविनाश ताजणे (रा. खामगाव जि. बुलढाणा ) असे त्याचे नाव आहे. संघमित्रा कुंभारे हिचा तो पूर्वाश्रमीचा मित्र आहे.

२० दिवसांत महागाव येथील शंकर कुंभारे यांच्या कुटुंबातील पाच जणांच्या गूढ मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. शंकर कुंभारे (५२), त्यांची पत्नी विजया (४५), विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) , मावशी आनंदा उर्फ वर्षा उराडे (५०,रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) व मुलगा रोशन कुंभारे (२८) अशी मृतांची नावे आहेत.

संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा प्रमोद रामटेके (४२) या दोघींनी मिळून हे हत्याकांड केल्याची खळबळजक माहिती तपासात समोर आली. त्या दोघी अहेरी पोलिसांच्या कोठडीत आहेत. चौकशीत रोजा रामटेके हिने गुन्ह्यासाठी वापरलेले विषारी पावडर शालेय मित्र अविनाश ताजणे याने उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले. तो हैद्राबादेत सुरक्षारक्षक म्हणून खासगी कंपनीत काम करतो. त्याने ऑनलाइन विषारी पावडर मागितले व ते संघमित्राला दिले. त्यास २६ रोजी अहेरी पोलिसांनी जेरबंद केले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ.सुदर्शन राठोड, पो.नि.मनोज काळबांडे तपास करत आहेत.

दरम्यान, ऑनलाईन खरेदी केलेले पावडरवर बंदी होती की नाही नाही, पैसे रोख दिले की ऑनलाइन, हे गुलदस्त्यात असून चौकशीनंतर सर्व तथ्य समोर येणार आहे.

चार दिवसांची वाढीव कोठडीदरम्यान, संघमित्रा कुंभारे, रोजा रामटेके यांची दहा दिवसांची कोठडीची मुदत संपल्याने २७ रोजी त्यांना व नव्याने अटक केलेला अविनाश ताजणे यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या सर्वांना ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारी