शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गडचिरोली पालिकेला मिळाले ५० लाख

By admin | Updated: September 21, 2015 01:21 IST

शहरात नवे घरबांधकाम व विद्युत मीटरसाठी नागरिकांना दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या माध्यमातून गडचिरोली नगर पालिकेला गेल्या अडीच वर्षात ५० लाख २१ हजार ५९२ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

अडीच वर्षांत : घर बांधकाम व वीज मीटर एनओसीची एकूण २१५ प्रकरणे मंजूरलोकमत विशेषदिलीप दहेलकर गडचिरोलीशहरात नवे घरबांधकाम व विद्युत मीटरसाठी नागरिकांना दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्राच्या माध्यमातून गडचिरोली नगर पालिकेला गेल्या अडीच वर्षात ५० लाख २१ हजार ५९२ रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. २०१३-१४ वर्ष ते २० सप्टेंबर २०१५ या अडीच वर्षाच्या कालावधीत गडचिरोली पालिकेने घर बांधकामाचे एकूण २१५ प्रकरणे मंजूर केली. शहरातील विविध वार्डातील नागरिकांना अकृषक प्लॉटवर नव्याने घर बांधकाम करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. तसेच नवीन घरात वीज मीटर जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. सदर प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी दिली जाते. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या वर्षभराच्या कालावधीत घर बांधकामासाठी परवानगी मागितलेल्या नागरिकांच्या अर्जाची तपासणी करून एकूण ७७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. या प्रकरणातून पालिका प्रशासनाला ८ लाख ६९ हजार २१३ रूपये कराच्या रूपात मिळाले. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या एक वर्षाच्या कालावधीत नव्या घर बांधकामाचे पालिका प्रशासनाने ११६ प्रस्ताव मंजूर केले. संबंधित नागरिकांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. या माध्यमातून पालिकेला कराच्या रूपात १६ लाख ५२ हजार ३७९ रूपयांचा महसूल प्राप्त झाला. २०१५-१६ या चालू वर्षात १ एप्रिल ते २० सप्टेंबर २०१५ पर्यंत घर बांधकामाबाबतचे २२ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून यातून पालिकेला १० लाख रूपयांचा महसूल मिळाला. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत पालिकेला घर बांधकाम एनओसीतून ३५ लाख २५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. न.प. प्रशासनाकडून एका महिन्यात जवळपास १०० नागरिकांना वीज मीटर जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येते. प्रती प्रमाणपत्र ५०० रूपये प्रमाणे एका महिन्याला ५० हजार रूपये मिळतात. २०१३-१४ व २०१४-१५ या दोन वर्षात पालिकेला वीज मीटर एनओसीच्या माध्यमातून १२ लाख व २०१५-१६ या चालू वर्षात २० सप्टेंबरपर्यंत तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. एकूणच अडीच वर्षाच्या कालावधीत पालिकेला वीज मीटर एनओसीतून १५ लाख रूपये मिळाले.एनओसीकरिता आवश्यक कागदपत्रेअकृषक प्लॉटवर नागरिकांना घर बांधकाम करण्यासाठी न.प.कडून नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. याकरिता अकृषक जमिनीचा सातबारा, भूखंडाचा लेआऊट, जमिनीचे अकृषक आदेश प्रमाणपत्र, विक्रीपत्र, घर बांधकामाचा नकाशा, मान्यताप्राप्त अभियंत्याच्या स्वाक्षरीचा अर्ज आदी कागदपत्रे आवश्यक आहे. घर बांधकाम एनओसीचे २५ प्रस्ताव प्रलंबितअकृषक प्लॉटधारक नागरिकांनी पालिकेकडे एनओसीकरिता अर्ज सादर केले आहेत. मात्र या अर्जासोबत अनेक आवश्यक कागदपत्रे नसल्याने चालू वर्षात घर बांधकामाचे जवळपास २५ प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती आहे. कागदपत्राची तपासणी आटोपल्यावर प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन तपासणी केल्यानंतर पालिकेकडून घर बांधकामासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. अकृषक प्लॉटच्या बाजार भावानुसार घर बांधकाम एनओसीकरिता न.प.कडून संबंधित घरमालकांवर शुल्क आकारण्यात येते.