शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत आश्रमशाळेतील दहावीची विद्यार्थिनी झाली प्रसूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 15:23 IST

अहेरी तालुक्यातील वेलगूरच्या राजे धर्मराव आश्रमशाळेत दहावीला शिकत असलेली विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देवर्गमित्रासोबत प्रेमप्रकरण मुख्याध्यापकासह तिघे निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यातील वेलगूरच्या राजे धर्मराव आश्रमशाळेत दहावीला शिकत असलेली विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी संस्थेने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच महिला व पुरूष अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित केले.विशेष म्हणजे सदर विद्यार्थिनीने दहावीची परीक्षाही दिली. पण तरीही तिच्याबद्दल कोणत्याही शिक्षकाला, अधीक्षकांना साधा संशयही आला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. आपल्याच वर्गात शिकणाऱ्या गावाकडच्या विद्यार्थ्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली त्या विद्यार्थिनीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देऊन आपली कोणाबद्दलही काही तक्रार नसल्याचे बयाणात म्हटले आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही दहावीत असले तरी ते २० वर्ष वयाचे आहेत. यापूर्वी दुसऱ्या गावातील आश्रमशाळेत दोघेही काही वर्ष नापास झालेले आहेत, अशी माहिती सहायक प्रकल्प अधिकारी जी.पी.चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या विद्यार्थिनीला वेदना होऊ लागल्यानंतर सुरूवातीला अहेरी व नंतर गडचिरोलीला भरती करण्यात आले. गडचिरोलीत तिने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे तिची ‘नॉर्मल डिलीव्हरी’ झाली आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे नंतर तिला चंद्रपूरला हलविण्यात आले. यासंदर्भातील तक्रार संस्थेकडून आल्यानंतर अहेरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने त्या मुलीचे बयाण घेतले. दरम्यान राजे धर्मराव शिक्षण संस्थेने मुख्याध्यापक एम.एस. कुर्वे, अधीक्षक आर.बी. पोलोजीवार व महिला अधीक्षिका डोंगरे यांना निलंबित केले.

वैद्यकीय तपासणीच होत नाही !वास्तविक प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची वर्षातून किमान तीन वेळा वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते. ही तपासणी फिरते वैद्यकीय पथक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक करते, पण प्रत्यक्षात अशी तपासणी केलीच जात नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते.आश्रमशाळेत राहणाऱ्या मुलींची नियमित मासिक पाळी येत असल्याची नोंद दर महिन्याला रजिस्टरमध्ये करावी लागते. या प्रकरणातील पीडित मुलीची मासिक पाळी नियमित येत असल्याचे नोंद आहे. यावरून ती नोंद किती तकलादू असते हे दिसून येत आहे.

टॅग्स :HelenहेलनWomenमहिला