शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली व गोंदियातील हत्तींचे होणार पेंच व ताडोबात स्थानांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:50 IST

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील सात हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील एक हत्ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देप्रधान मुख्य संरक्षकांचे निर्देशवाघाचा मागोवा घेण्याचे देणार प्रशिक्षण

श्रीधर दुग्गीरालापाटी ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्ती कॅम्प येथील सात हत्ती पेंच व्याघ्र प्रकल्प व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील एक हत्ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी वसंती, मंगला, अजित, राणी, प्रियंका व आदित्य हे सात हत्ती आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात रूपा नावाची हत्तीन आहे. कमलापूर येथील सर्व हत्ती, त्यांच्यासाठी वापरले जाणारे प्रशिक्षण व इतर साहित्य तसेच उपलब्ध कर्मचारी यांचे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे स्थानांतरण करावे, या सर्व हत्तींना पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचा मागोवा घेण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिले आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यापूर्वीच चार हत्ती आहेत. नवेगाव-नागझिरा येथील एक हत्ती त्या ठिकाणी स्थानांतरित केला जाणार असल्याने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील हत्तींची संख्या पाचवर पोहोचणार आहे. नवीन हत्तीला सुद्धा वाघाचा मागोवा घेण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सर्व हत्तींचे स्थानांतरण १५ फेब्रुवारीपूर्वी संबंधित ठिकाणी करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार वनविभाग तयारीला लागला आहे.

नागरिकांमध्ये संतापकमलापूर येथील हत्ती कॅम्प हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव पर्यटनस्थळ आहे. राज्यभरातील अनेक पर्यटक हत्ती पाहण्यासाठी कमलापूर हत्ती कॅम्पला भेट देतात. वन विभागाने या सर्व हत्तींना लाकडाची वाहतूक करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. मात्र आता या सर्व हत्तींचे स्थानांतरण केले जाणार असल्याने कमलापूर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला जात आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प