शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गडचिरोली व देसाईगंजमध्ये सभापती अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:43 IST

एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यामुळे गडचिरोली व देसाईगंज या दोन्ही नगर पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सभा बोलाविण्यात आल्या. सदर दोन्ही नगर पालिकेत भाजपला बहुमत असल्याने या दोन्ही नगर पालिकेत सभापतींची निवड अविरोध करण्यात आली. गडचिरोली नगर पालिकेत महत्त्वाच्या दोन समित्यांवर जुन्याच सभापतींची पुनर्निवड करण्यात आली असून चार समित्यांवर नव्या नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देदेसाईगंज न.प.मध्ये सर्वांचेच खांदेपालट : गडचिरोलीत दोन सभापतींची फेरनिवड, चार नवे चेहरे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/देसाईगंज : एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यामुळे गडचिरोली व देसाईगंज या दोन्ही नगर पालिकेत विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी विशेष सभा बोलाविण्यात आल्या. सदर दोन्ही नगर पालिकेत भाजपला बहुमत असल्याने या दोन्ही नगर पालिकेत सभापतींची निवड अविरोध करण्यात आली. गडचिरोली नगर पालिकेत महत्त्वाच्या दोन समित्यांवर जुन्याच सभापतींची पुनर्निवड करण्यात आली असून चार समित्यांवर नव्या नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.गडचिरोली व देसाईगंज या नगर पालिकेतील जुन्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ २३ जानेवारी रोजी संपुष्टात येणार आहे. २४ जानेवारीपासून पालिकेचे नवे सभापती कारभार सांभाळणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी विषय समितीच्या सभापती निवडीसाठी विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला होता.गडचिरोली नगर पालिकेतील भाजपचे गटनेते अनिल कुनघाडकर यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष खा.अशोक नेते यांच्या सल्ल्यानुसार सहा सभापती पदांसाठी सहा नगरसेवकांची नावे सहायक पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्याकडे सादर केली. त्यानंतर दुपारी २ वाजता पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार डी. एस. भोयर यांनी विशेष सभेला सुरूवात केली. एका सभापतीपदासाठी एकाच नगरसेवकाचे नाव नामनिर्देशित करण्यात आल्याने सहा नगरसेवकांची सहा समित्यांवर सभापती म्हणून अविरोध निवड करण्यात आली.यामध्ये बांधकाम सभापतीपदी आनंद श्रुंगारपवार तर आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांची अविरोध फेरनिवड करण्यात आली. गडचिरोली पालिकेत चार समित्यांवर नव्या नगरसेवकांना स्थान देण्यात आले. त्यात पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी मुक्तेश्वर काटवे, शिक्षण सभापतीपदी वर्षा वासुदेव बट्टे, महिला व बालकल्याण सभापतीपदी गीता पोटावी तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी प्रशांत खोब्रागडे यांची अविरोध निवड करण्यात आली.सभापतींच्या निवडीनंतर भाजपचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पालिकेच्या परिसरात एकमेकांना पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, भुपेश कुळमेथे, प्रविण वाघरे, केशव निंबोड, संजय मेश्राम, सतीश विधाते, रमेश चौधरी यांच्यासह सर्वच २५ नगरसेवक उपस्थित होते.देसाईगंज न.प. सभागृहात सोमवारी विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये भाजपचे गटनेते किसन नागदेवे यांची पाणी पुरवठा सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी श्याम उईके, शिक्षण सभापतीपदी मनोज खोब्रागडे तर महिला व बालकल्याण सभापतीपदी किरण रामटेके यांची अविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष ज्या समितीचा पदसिद्ध सभापती असेल ती विषय समिती वगळण्यात आल्याने बांधकाम सभापतीची निवडणूक झाली नाही. पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार टी.जी.सोनवाने यांनी तर सहायक पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मावळते सभापती सचिन खरकाटे, दीपक झरकर, करुणा गणवीर, आशा राऊत यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.अन् उपसभापतिपद गोठवलेगडचिरोली नगर पालिकेत यापूर्वी अनेकदा महिला व बाल कल्याण समितीचे उपसभापतीपद ठेवण्यात येत होते. गडचिरोली पालिकेत भाजपची पहिल्यांदाच सत्ता आल्यानंतर येथे महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदी दोन महिला नगरसेवकांची वर्णी लावण्यात आली होती. मात्र सोमवारी झालेल्या निवडणुकीत सदर समितीचे उपसभापतीपद गोठविण्यात आले. पक्षश्रेष्ठी व पालिकेतील नेत्यांचा उपसभापतीपद ठेवण्याचा विचार होता. तशा हालचालीही सुरू झाल्या. मात्र काही पुरूष व महिला नगरसेवकांनी महिला व बाल कल्याण समितीलाच उपसभापतीपद का, असा सवाल उपस्थित केला. उपसभापती द्यायचे असेल तर इतरही महत्त्वाच्या समित्यांवर अशा प्रकारचे उपसभापतीपद देण्यात यावे, असा सूर काढण्यात आला. त्यामुळे या निवडणुकीत महिला व बाल कल्याण समितीचे उपसभापतीपद निवडण्यात आले नाही.दोन माजी नगराध्यक्ष झाले सभापतीदेसाईगंज नगर पालिकेत सर्व विषय समित्यांच्या सभापतींची खांदेपालट झाली असली तरी दोन सभापतीपद दोन माजी नगराध्यक्षांनी पटकावल्याने हा चर्चेचा विषय होता. यामुळे सामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक झालेल्या अनेक इच्छुकांना आपल्या इच्छेला आवर घालावा लागल्याने त्यांच्यात काहीशी नाराजी आल्याचे दिसत होते.पालिकेतील नवे सभापतीगडचिरोलीअनिल कुनघाडकर - आरोग्य व स्वच्छताआनंद श्रुंगारपवार - बांधकाममुक्तेश्वर काटवे - पाणी पुरवठावर्षा वासुदेव बट्टे - शिक्षणगीता पोटावी - महिला व बाल कल्याणप्रशांत खोब्रागडे - नियोजन व विकासदेसाईगंजकिसन नागदेवे - पाणी पुरवठाशाम उईके - आरोग्य व स्वच्छतामनोज खोब्रागडे - शिक्षणकिरण रामटेके - महिला व बाल कल्याण