शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत पुराचा कोप; जनजीवन विस्कळीत, २१०३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 15:09 IST

आतापर्यंत १७७ कुटुंबांतील २१०३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा वगळता शाळा-आस्थापना शनिवारपर्यंत बंद

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या १० जुलैपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांसह छोटे नाल्यांना पूर येऊन अनेक मार्ग बंद झाले आहेत. आता जलप्रकल्पांमधून सोडल्या जात असलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती आणखीच बिकट होत आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी अत्यावश्यक सेवा वगळता शाळा-महाविद्यालयांसह खासगी आस्थापना बंद ठेवण्याच्या आदेशाला पुन्हा शनिवारपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली, आरमोरी या भागातही पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने दि.११ ते १३ जुलैदरम्यान शाळा-आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. आता १६ जुलैपर्यंत तो आदेश कायम राहणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी तीन दिवस अतिमहत्त्वाचे काम नसताना बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

वैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांत विदर्भातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. वर्धा तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पाणीही वर्धा नदीमार्फत चपराळा येथून वैनगंगेला मिळते. आता गोसीखुर्द धरणातून जास्त पाणी सोडण्यात येत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत वडसा, आरमोरी आणि गडचिरोली येथील वैनगंगा नदीपात्रात व जवळील नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील वडसा, आरमोरी व गडचिरोलीतील गावांना सर्तकतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी नदी, नाले ओलांडण्याचे टाळावे. पाणी पुलावरून वाहात असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

गरोदर महिलांना सुखरूप हलविले

सिरोंचा तालुक्यात प्राणहिता नदीच्या पुरामुळे अनेक भागात स्थिती गंभीर होत आहे. तसेच मेडीगड्डा बॅरेजच्या विसर्गामुळे गोदावरी नदीचे पाणीही काही गावांमध्ये शिरले आहे. अशा पूरग्रस्त भागातून बचाव पथकाने बुधवारी दोन गरोदर महिलांना बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले.

अहेरी-सिरोंचातील २१०३ लोकांना हलविले

सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात सलग पाचव्या दिवशी जोरदार पाऊस झाला. यासोबत गोदावरी, प्राणहिता आणि वैनगंगा नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील २१०३ लोकांना संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. याशिवाय पुरात अडकलेल्या लोकांना एसडीआरएफ आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. आता पावसाच्या पाण्यापेक्षाही मेडीगड्डा आणि गोसेखुर्द प्रकल्पातून सोडल्या जात असलेल्या पाण्यामुळे काही प्रमुख नद्या आणि उपनद्या फुगल्या आहेत. त्यामुळे नद्यांच्या परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती आणखी बिघडल्याचे दिसून येते. गोसेखुर्द प्रकल्पाच्या विसर्गामुळे आता उत्तर गडचिरोली भागातही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना शनिवारपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसGadchiroliगडचिरोली