शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
2
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
3
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
4
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
5
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
6
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
7
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
8
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
9
Tanya Mittal : "कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
10
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
11
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
12
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
13
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
14
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
15
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
16
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
17
नवीन कामगार कायद्यांमुळे हातात येणारा पगार खरंच कमी होणार?; कामगार मंत्रालयाचा महत्त्वाचा खुलासा, सगळं गणित समजावलं
18
रोहित शर्मा अन् विराट कोहलीच्या पगारात होणार मोठी घट; शुभमन गिलला मिळणार 'बंपर फायदा'?
19
पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर १४०० कोटींचा भूसंपादन घोटाळा ! भाजपा- शिंदे सेनेच्या नेत्यांवर सुषमा अंधारेंच्या आरोपांनी खळबळ
20
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची लुट, युरियाच्या बॅगमागे विक्रेत्यांची नफेखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:08 IST

कारवाईची मागणी : कृषी विभाग ढिम्म, भरारी पथके नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नियमानुसार रासायनिक खते, बियाणांची विक्री न करणे, स्टॉक बुक न बाळगणे व रेट बोर्ड न लावणे आदींसह विविध प्रकारची अनियमितता कृषी सेवा केंद्रांमध्ये आढळून येते; परंतु तरीही नियमाला न जुमानता कृषी केंद्रचालक युरिया व अन्य रासायनिक खतांची चढत्या भावात विक्री करतात. यावर कृषी विभागाकडून नरमाईची भूमिका घेतली जात असल्याने त्यांचे फावते.

सध्या अधिक मुदतीच्या धानाला शेतकरी युरियाची मात्रा देत आहेत. अशातच काही ठिकाणाहून युरियाची विक्री १०० रुपये अधिक किमतीत करीत आहेत. म्हणजेच २६६ रुपयांऐवजी ३५० ते ३६० रुपये घेतले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

खरपुंडी, पोर्ला परिसरात ३५० रुपयाला युरियाची विक्रीगडचिरोली तालुक्यातील खरपुंडी तसेच पोर्ला येथे ३५० रुपयाला युरियाची एक बॅग विक्री केली जाते. याशिवाय अन्य रासायनिक खतेसुद्धा चढत्या भावात विक्री केले जातात. शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करणे गरजेचे आहे.

विक्रीबंदीचे आदेश नावालाच भरारी पथकाने तपासणी केलेल्या व सदोष व अनियमितता आढळलेल्या एकूण १७ केंद्रांना विक्रीबंदीचे आदेश सुरुवातीच्या हंगामात देण्यात आलेले होते. हे आदेश दीर्घ काळासाठी नसतात. त्यामुळे पुन्हा विक्रीचे आदेश बहाल केले जातात. किमान एक वर्षतरी बंदी घातल्यास शेतकऱ्यांची लूट करण्याची केंद्रचालकांची हिंमत होणार नाही.

हंगामापूर्वी कारवाई; नंतर नरमाई 

  • खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर दि. २६ जून रोजी तपासणी करून २७ जून रोजी कारवाई करण्यात आली. यात दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले, तर २३ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. 
  • गडचिरोली तालुक्यातील १८ रासायनिक 3 खतेविक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर देसाईगंज तालुक्यातील देसाईगंज व कोकडी येथील दोन केंद्रांचे रासायनिक खते परवाने रद्द करण्यात आले. 
  • याशिवाय याच तालुक्यातील कोकडी येथील ३ व देसाईगंज येथील एक असे खतांचे चार व देसाईगंज येथील बियाणांचा एक परवाना निलंबित करण्यात आला होता.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFertilizerखतेFarmerशेतकरी