शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

चार वर्षांपासून व्याज सवलतीचे अनुदान थकले

By admin | Updated: February 9, 2015 23:13 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने व्याज सवलत योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. या कर्जावरील व्याजाची रक्कम केंद्र व

दिगांबर जवादे - गडचिरोलीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने व्याज सवलत योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. या कर्जावरील व्याजाची रक्कम केंद्र व राज्य शासन जिल्हा बँकेला उपलब्ध करून देईल, अशी तरतूद आहे. मात्र मागील चार वर्षांपासून व्याज सवलत अनुदानाचे २ कोटी ७ लाख ६९ हजार रूपये थकले आहेत. त्यामुळे सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. शेतकऱ्याला कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे होण्याची पाळी येऊ नये, त्याच बरोबर शेतकऱ्याला शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करता यावा, कर्जासाठी कोणासमोर हात जोडण्याची पाळी येऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना व केंद्र शासनाकडून व्याज परतावा योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेतून कर्जावरील व्याजाची ६ टक्के रक्कम शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडून बिनव्याजासह कर्जाची वसुली करावी, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बिनव्याजासहच कर्ज वसूल करीत आहे. मात्र व्याजाची रक्कम शासनाकडून तत्काळ मिळत नसल्याने बँकेपुढची आर्थिक अडचणी वाढत चालली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गतचे मागील चार वर्षांपासूनचे १ कोटी २८ लाख ९९ हजार एवढे अनुदान थकले आहे. तर केंद्र शासनाच्या व्याज परतावा योजनेंतर्गतच्या २०१३-१४ या वर्षातील ७८ लाख ७० हजारापैकी एकही अनुदान प्राप्त झाले नाही. शासनाकडून नियमितपणे अनुदान प्राप्त होत नसले तरी बँक मात्र स्वत:कडेचे पैसे टाकून शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा थेट लाभ दरवर्षीच देत आहे, हे विशेष.