शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चार टक्के शिक्षक अजूनही लसीपासून दूर; विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. शहरी भाग वगळता सर्वत्र या वर्गाच्या शाळा सुरू झाल्या. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू हाेताना शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काेराेना चाचणीसह काेराेना लसीकरण बंधनकारक केले आहे. मात्र, अजूनही चार टक्के शिक्षकांनी काेराेनाची लस घेतली नाही. बऱ्याच शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डाेस घेतला आहे. 

दिलीप दहेलकरलाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना संसर्गाचा प्रभाव कमी हाेत असल्यामुळे राज्य शासन प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे शासनाने काेराेना लस घेण्यासाठी शिक्षकांसहशिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ५ सप्टेंबर २०२१ ची डेडलाइन दिली हाेती. ही डेडलाइन संपून दाेन ते तीन दिवस उलटत आहेत. तरी जिल्ह्यातील जवळपास चार टक्के शिक्षक काेराेना लस घेण्यापासून दूर आहेत. काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही काेराेनाची लस घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे तरी कसे, असा सवाल पालकांकडून उपस्थित हाेत आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. शहरी भाग वगळता सर्वत्र या वर्गाच्या शाळा सुरू झाल्या. दरम्यान, शाळा, महाविद्यालयांमध्ये रुजू हाेताना शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काेराेना चाचणीसह काेराेना लसीकरण बंधनकारक केले आहे. मात्र, अजूनही चार टक्के शिक्षकांनी काेराेनाची लस घेतली नाही. बऱ्याच शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डाेस घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्यासाठी वरिष्ठस्तरावर तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी काेराेना लसीकरण व काेराेना चाचणीबाबतची माहिती सर्व जिल्ह्यातून मागविण्यात आल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत शाळांबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

१८८ जणांची लसीकरणाकडे पाठमाध्यमिक विभागातील १०० शिक्षक व ४५ कर्मचारी, असे एकूण १४५ जणांनी काेराेनाची लस घेतली नाही. प्राथमिक विभागांतर्गत कार्यरत ४० शिक्षक व तीन कर्मचारी, अशा एकूण ४३ जणांनी अजूनही लस घेतली नाही. जिल्ह्यात शिक्षक, कर्मचारी मिळून एकूण १८८ जणांनी सध्यातरी लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे. याचे कारण अनेक असू शकतात. यामध्ये विविध आजार व जुन्या व्याधी राहू शकतात.

शासनाच्या निर्देशानुसार ५ सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काेराेना लसीकरण करून घेणे आवश्यक हाेते. जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक व कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली आहे. केवळ चार टक्के शिक्षक व काही कर्मचारी लस घेण्यापासून दूर आहेत. आपण ४ सप्टेंबरला सर्व मुख्याध्यापकांना सूचना करून काेराेना लसीकरणाबाबतची माहिती पाठविण्याची सूचना केली आहे. पाेळा सणाची सुटी आल्याने ही माहिती १०० टक्के प्राप्त झाली नाही. येत्या दाेन दिवसांत हा डेटा प्राप्त हाेणार आहे. त्यानंतरच लस न घेतलेल्यांचे तंताेतंत आकडे मिळतील.-आर.पी. निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गडचिराेली 

शासनाने संपूर्ण खबरदारी घेऊन प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्यास हरकत नाही. मात्र, त्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काेराेना लसीकरण करणे महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण सुरक्षितता असेल, तरच पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास घाबरणार नाहीत. -पांडुरंग वेलादी, पालक

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसTeacherशिक्षक