शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद तेलतुंबडेसह चार नक्षल नेत्यांचा घेतला वेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 06:19 IST

१६ मृतदेहांची ओळख पटली, २ डिव्हिजनल कमांडर्सचा समावेश

ठळक मुद्देसी-६० पथकाने नक्षल्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला

गडचिरोली : तब्बल साडेतीन वर्षांनंतर गडचिरोलीपोलिसांना नक्षलविरोधी अभियानात सर्वांत मोठे यश मिळवून देणाऱ्या शनिवारच्या चकमकीत मारल्या गेलेल्या २६ पैकी १६ नक्षलींची ओळख पटली असून, त्यात नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरी नक्षलवाद्यांना झटकाही कारवाई म्हणजे जंगलातीलच नाही, तर शहरी भागात काम करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी जोरदार झटका आहे. या कारवाईमुळे देशात गडचिरोली आणि महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली गेली आहे, अशी भावना गडचिरोली-गोंदिया क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

सहा नक्षली महिलांचा समावेशnमृत नक्षलींमध्ये सहा महिला नक्षलवादी आहेत. त्यातील एकीची ओळख पटली आहे. nती तेलतुंबडेची बॉडीगार्ड म्हणून काम करणारी विमला ऊर्फ इमला ऊर्फ कमला ऊर्फ मान्सो बोगा (पीसीसीएम) असून तिच्यावर ८ लाखांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते. nइतर पाच महिला आणि पाच पुरुष नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही.

मृतांच्या शिरावर होती बक्षिसेमिलिंद तेलतुंबडे याच्याव्यतिरिक्त मृतांमध्ये नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य (डीव्हीसीएम) आणि कंपनी ४ चा कमांडर लोकेश ऊर्फ मंगू मडकाम (बक्षीस २० लाख रुपये), कसनसूर दलममध्ये कार्यरत विभागीय समिती सदस्य महेश ऊर्फ शिवाजी गोटा (बक्षीस १६ लाख रुपये), कोरची दलम कमांडर किशन ऊर्फ जैमन (बक्षीस ८ लाख), कसनसूर दलम कमांडर सन्नू ऊर्फ कोवाची (बक्षीस ८ लाख) आणि मिलिंद तेलतुंबडेचा बॉडीगार्ड भगतसिंग ऊर्फ प्रदीप ऊर्फ तिलक जाळे (बक्षीस ६ लाख) यांचाही समावेश आहे. 

मिलिंद तेलतुंबडेच्या शिरावर ५० लाखांचे तर १६ नक्षलींवर मिळून एकूण १ कोटी ५४ लाख रुपयांचे बक्षीस होते. उर्वरित १० नक्षलींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

अत्याधुनिक रायफल्ससह शस्रसाठा जप्तघटनास्थळी पोलीस पथकाला पाच एके-४७ रायफली, एक एकेएम युबिजिअल, नऊ एसएलआर रायफली, तीन ३०३ रायफली, नऊ २.२ सिंगल बोअर पिस्तुल, एक इन्सास रायफल, एक पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली.

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस