शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:26 IST

गडचिरोली व देसाईगंज तालुक्यात पोलिसांनी अवैधपणे दारू वाहतूक करणाºयांवर केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा पकडला.

ठळक मुद्देदोन वाहनेही ताब्यात : गडचिरोली ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली व देसाईगंज तालुक्यात पोलिसांनी अवैधपणे दारू वाहतूक करणाºयांवर केलेल्या कारवाईत दोन वाहनांसह चार लाखांचा देशी-विदेशी दारूसाठा पकडला. दोन्ही वाहने जप्त करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.शुक्रवारच्या रात्री पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनात गडचिरोली ठाण्याचे निरीक्षक संजय सांगळे व एसडीपीओ कार्यालयातील पोलीस हवालदार राजेंद्र तितीरमारे, विजय राऊत, नापोशि दीपक डोंगरे, हवालदार नरूले, राऊत यांनी आरमोरी मार्गावरील खरपुंडीजवळ सापळा रचला. त्यात टाटा इंडिगो कार (एमएच ३१, सीएन ६३७८) हे वाहन संशयास्पदरित्या आढळल्यानंतर सिनेस्टाईल पाठलाग करून त्या वाहनाची तपासणी केली. त्यात इम्पेरियल ब्लू या कंपनीच्या १२ पेट्या (प्रतिपेटी १८० मिलीच्या ४८ निप) व्हिस्की आढळली. त्या ५७६ सीलबंद निपचा गडचिरोलीतील विक्री किमतीनुसार (३०० रुपये प्रति निप) १ लाख ७२ हजार रुपये किमतीची दारू अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचे आढळले. याप्रकरणी आरोपी अरुण केशव अष्टणकर रा.खरबी, पो.हुडकेश्वर ता.गडचिरोली याच्याविरूद्ध कलम ६५ (ई), ९८ (क) मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.दुसºया कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे केलेल्या कारवाईत देसाईगंज ते अर्जुनी मार्गावर सापळा रचून बेकायदेशिरपणे दारू वाहतूक करणाºया मारूती स्विफ्ट (एमएच ३१, सीएन ४८२०) या वाहनाला थांबविले. यावेळी चालकाच्या बाजुला बसून असलेला इसम सुरज पत्रे रा.गांधी वार्ड, देसाईगंज हा पळून जाण्यात यशस्वी झाला. वाहनचालक दिलीप आशन्ना कुचलकार रा.आंबेडकर वार्ड, देसाईगंज याला ताब्यात घेऊन वाहनातील दारूसाठा जप्त केला. त्यात देशी दारू सुप्रिम नंबर १ या कंपनीच्या ९० मिलीच्या २८०० सीलबंद निप, १८० मिलीच्या १९२ निप, रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या ४०० निप, इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या १११ निप असा अडीच लाखांचा दारूसाठा तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली. ही कार देसाईगंज येथील दारू पुरवठादार गुरूबचसिंग मक्कड याच्या मालकीची आहे. या तिघांवरही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आली.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निपीक्षक प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊराव बोरकर, नरेश सहारे, दुधराम चवारे, चंदू मोहुर्ले, प्रशांत पातकमवार यांनी केली.