शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

हरणाच्या अवयवासह चार शिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: June 16, 2015 02:11 IST

वैरागड वन परिक्षेत्रांतर्गत मेंढेबोडी जंगल परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावल्या जात

वनाधिकाऱ्यांची कारवाई : मेंढेबोडीत सुरू होती मांसाची विल्हेवाटवैरागड : वैरागड वन परिक्षेत्रांतर्गत मेंढेबोडी जंगल परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करून मांसाची विल्हेवाट लावल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावरून वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेंढेबोडी गावात धाड टाकून हरणाच्या मांसासह चार शिकाऱ्यांना अटक केल्याची घटना सोमवारी घडली.तुलाराम मडावी, गौतम लालाजी दुग्गा रा. मेंढेबोडी, बारीकराव गावडे रा. सोनेरांगी व देवनाथ दुग्गा रा. कराडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वैरागड येथील वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेंढेबोडी येथे तुलाराम मडावी यांच्या घरी धाड टाकली असता, या ठिकाणी हरणाच्या मांसाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू होता. वनाधिकाऱ्यांनी मडावी यांच्या घरून हरणाचे मांस, डोके, पाय आदी अवयव व फास, कुऱ्हाड हे शिकारीचे साहित्य जप्त केले. बारीकराव गावडे, तुलाराम मडावी, देवनाथ दुग्गा या चार आरोपींना अटक केली. त्यानंतर दारूच्या नशेत गावाबाहेर झाडाखाली पडून असलेल्या देवनाथ दुग्गा रा. कराडी यालाही वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या चारही आरोपींवर वनकायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिकार प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असल्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.सदर कारवाई आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर, क्षेत्र सहायक शेंडे, वनरक्षक एम. के. निमजे, पी. के. कोडमलवार, आर. टी. किरमिरे, के. टी. ठिकरे, गीते, रेमाजी तलांडे, तामराव टेंभुर्णे, सोमेश्वर दोनाडकर आदींनी केली. (वार्ताहर)