शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
3
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
4
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
5
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
6
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
7
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
8
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
9
मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...
10
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
11
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
12
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
13
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
14
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
15
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
16
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
17
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
18
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
19
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
20
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा

वनविभागाने अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 1:29 AM

शहरालगतच्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिकांनी चुना, कापडी रिबीन बांधून अतिक्रमण करून जागेची आखणी केली. या बाबीची माहिती मिळताच बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवून अतिक्रमीत क्षेत्र नेस्तनाबूत केले आहे.

ठळक मुद्देधडक कारवाई : वाहने जप्त करून चामोर्शी मार्गावरील वनजमीन केली मोकळी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरालगतच्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिकांनी चुना, कापडी रिबीन बांधून अतिक्रमण करून जागेची आखणी केली. या बाबीची माहिती मिळताच बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मोहिम राबवून अतिक्रमीत क्षेत्र नेस्तनाबूत केले आहे. अतिक्रमणधारकांचे साहित्य तसेच दुचाकी वाहने, सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत.१ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वनविभागामार्फत वन्यजीव सप्ताह राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याची संधी साधून गोकुलनगर लगत असलेल्या कक्ष क्रमांक १७० मध्ये काही नागरिक झुडूपी जंगलाच्या परिसरात जागेची आखणी करीत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात वनपरीक्षेत्र अधिकारी डी.व्ही. कैलुके यांनी वनपरीक्षेत्रातील संपूर्ण कर्मचाºयांना घेवून अतिक्रमीत क्षेत्रात धडक कारवाई राबविली. जागेवर कब्जा करण्यासाठी लावलेले रिबिन काढून टाकण्यात आले. घटनास्थळावर चुन्याने आखणी करीत असलेल्या लोकांकडून साहित्य हस्तगत केले. तसेच त्यांच्याकडील दुचाकी वाहने जप्त करून वनविभागाच्या वाहनाने वनविभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले.कारवाई राबविताना क्षेत्रसहायक जेणेकर, काळे, हेमके, साखरकर, वनरक्षक कवडो, ठाकरे, राठोड, चव्हाण, मट्टामी, बोरकुटे, बोढे, भसारकर, धुर्वे, मुनघाटे, अलोणे, दुर्गे, लोणारे, धात्रक, कापकर, टोंगे, कोडाप, शिंदे, दुधबळे, गरफडे, डिकोंडावार, रायपुरे, मडावी, सयाम, दिगे व वनपरीक्षेत्रातील वनमजूर उपस्थित होते.वनविभागाने केलेल्या या कारवाईचा तपशील वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. सदर कारवाईमुळे शहरातील अतिक्रमधारक धास्तावले असल्याचे दिसून येत आहे.गोकुलनगरलगतचा तलाव व इतर ठिकाणचे अतिक्रमण कायमचगडचिरोली शहरात गेल्या तीन ते चार वर्षांपासून जमीन व प्लॉटचे भाव वाढले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून जागा कब्जात घेत आहेत. महसूल विभागाच्या हद्दीत येणाऱ्या गोकुलनगर लगतच्या तलावात अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. याशिवाय चामोर्शी मार्ग तसेच धानोरा मार्गालगतही अतिक्रमण करण्यात आले आहे. मात्र शहरातील या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भातील तक्रारी करूनही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली नाही. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येते. मात्र कारवाईसाठी पुढाकार घेतला जात नसल्याने अतिक्रमण कायम असल्याचे दिसून येते.

टॅग्स :forest departmentवनविभागEnchroachmentअतिक्रमण