शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित पाऊस होण्याचा अंदाज

By admin | Updated: May 27, 2014 00:51 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षी एवढा पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर पाऊस अनियमित पडेल, असा अंदाज पंचांगकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहणी नक्षत्राला २५ मे

वैरागड : यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षी एवढा पाऊस पडणार नाही. त्याचबरोबर पाऊस अनियमित पडेल, असा अंदाज पंचांगकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. रोहणी नक्षत्राला २५ मे पासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे. साहजीकच शेतकरी वर्गाचे पाऊले आता पंचांगकर्त्यांकडे वळू लागली आहेत. त्यांच्याकडून वर्षभराच्या पावसाचा अंदाज घेतला जात आहे. मानापूर येथील रामभाऊ हस्तक व गणेश वझे या पंचांगकर्त्यांनी सांगितले की, रोहणी नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. या नक्षत्र काळात आकाश अभ्राच्छादीत राहील. उकाळ्यात वाढ होईल, मात्र पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे सांगितले. मृगनक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात होणार आहे. या नक्षत्राचे वाहन हत्ती असल्याने या नक्षत्रात ढगांचा गडगडाट आणि वीजा चमकून वादळ, वार्‍यासह पावसाला ८ जूनच्या दरम्यान सुरूवात होणार आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. आद्रा नक्षत्र चांगल्या पावसाचा नक्षत्र म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी चांगला पाऊस पडेल. भात पिकासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज राहते. एवढ्या पावसासाठी शेतकर्‍याला प्रतीक्षा करावी लागणार आहे. पूनर्वसु हा नक्षत्र पावसाचा नक्षत्र म्हणून ओळखला जातो. या नक्षत्राचे वाहन गाढव आहे. या नक्षत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर येऊन जीवित व आर्थिक हानी होईल. धानपट्ट्यात धान लागवडीला सुरूवात होईल. १५ आॅगस्टपर्यंत पर्जन्यवृष्टी कायम राहील. मघा, पूर्वा या नक्षत्रामध्ये अनियमित पाऊस राहणार आहे. अंतिम चरणातील हस्त, चित्रा व स्वाती या नक्षत्रांच्या काळातही पाऊस होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. मृग नक्षत्रात ८ ते २० जूनपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. पूनर्वसु, पुष्प या नक्षत्र काळात अनियमित पाऊस पडेल. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पंचांगकर्ते व वेधशाळेने वर्तविलेले अंदाज खोटे ठरवित प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली होती. प्रारंभीचा रोहणी नक्षत्र वगळता सर्वच नक्षत्रांमध्ये शेवटपर्यंत पाऊस पडला होता. पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यातच विदर्भातील सर्व तलाव, बोळ््या पाण्याने भरल्या होत्या. सततच्या पूर व पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व आर्थिक हानी झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. या पिकासाठी अगदी सुरूवातीपासून तर धान पीक निघेपर्यंत मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज राहते. त्यामुळे जेवढा पाऊस अधिक तेवढे धान पिकाचे उत्पादन चांगले असा अंदाज शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जातो. मात्र पुरामुळे धान पीक कुजून उत्पादनात घट होते. जास्त पावसामुळे मात्र सोयाबिन, तूर, कापूस या पिकांना फटका बसण्याची शक्यता राहते. (वार्ताहर)