शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

पूरग्रस्तांना लवकरच मदत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : नागरिकांनी वस्तू स्वरूपात मदत पाठविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यात ओढवलेल्या नैसर्गिक संकटातून पूरग्रस्त नागरिकांना सावरण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून त्यांना पंचनामे करून नुकसानाचा अंदाज येताच शासकीय मदतीचेही वाटप केले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी शक्यतो त्यांना आवश्यकता असलेल्या वस्तूंच्या स्वरूपात मदत पाठवावी किंवा आर्थिक मदत द्यायची असल्याचे मुख्यमंत्री सहायता निधीतच द्यावी, असे आवाहन केले.अनेक वर्षानंतर भामरागड तालुक्यात यावर्षी जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड होऊन पशुहाणीही झाली. अनेकांच्या शेतीचेही नुकसान झाले. या सर्व नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी भामरागड तालुक्यातील महसूल कर्मचाºयांच्या दिमतीला बाहेरील तालुक्यातील तलाठ्यांना पाठविण्यात आले आहे. परंतू पंचनामे करण्यासाठी गावोगावी पोहोचण्यातही नाल्यांच्या अडचणी येत आहे. तसेच आरोग्य विभागाचीही जिल्हास्तरीय चमू सर्व गावांमध्ये जाऊन तपासणी करीत आहे. जलजन्य आणि कीटकजन्य आजारांपासून वाचण्यासाठी पाण्याच्या स्त्रोतांमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी सध्या उकळूनच पाणी प्यावे असेही आवाहन करण्यात आले आहे. पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यासाठी १० अभियंत्यांना तर पशुंचे नुकसान पाहण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांना पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.दरम्यान अनेक सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालयांसह दानशूर व्यक्तिंकडून भामरागडवासियांसाठी वस्तूरूपात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शुक्रवारी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाने गुंडुरवाही, कोटपर्सी गावात जाऊन पूरग्रस्तांना दैनंदिन वस्तूंची मदत केली. दुर्गम भाग असल्याने त्या गावांना जाण्यासाठी चांगले रस्ते नाही. तेथील ४ घरे उद्धस्त झाली आहेत. तहसीलदार कैलास अंडील प्रत्येक नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी धावपळ करीत आहे.निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा सज्जविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या मतदारांमध्ये आणखी २०३० मतदारांची भर पडली आहे, तर ९२६ मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ३१ आॅगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्यानुसार जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमिळून ७ लाख ७४ हजार ९४८ मतदार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सिंह व उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी दिली. यावेळी ना.तहसीलदार विवेक चडगुलवार हेसुद्धा उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर