नगर परिषद, गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त नगराध्यक्ष याेगीता पिपरे यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. याप्रसंगी आराेग्य सभापती अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, शिक्षण सभापती वर्षा नैताम, नियाेजन सभापती यशवंत खाेब्रागडे, पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, मुख्याधिकारी संजीव ओहाेळ, सर्व नगरसेवक तसेच कर्मचारी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन गणेश ठाकरे यांनी केले. आभार गणेश नाईक यांनी मानले.
गाेंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्राचार्य संजीव गाेसावी यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. प्रमुख अतिथी म्हणून शंखदरवार, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रहिम पटेल तर आभार गजानन अनमाेलवार यांनी मानले.
केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामाेर्शी : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी प्राचार्य डाॅ. दिनेश सुरजे, हर्ष हरडे, स. प्रा. छबील दुधबळे, तुषार भांडारकर, भाेजराज कुमरे, श्रीकांत सरदारे, रूपेश चाैधरी, किशाेर गहाणे, गुणेश चाचेरे, चंद्रशेखर टेकाडे, प्रा. शारदा दुर्गे, जयश्री कानकाटे, शिक्षकेतर कर्मचारी श्याम भैसारे, संताेष पांचलवार, देवदास ठाकरे, यशवंत भरणे, अनिल धाेंगडे, पाैर्णिमा सालेकर, विजय किरमे, जगन्नाश पेशट्टीवार, सुरज बावणे, प्रवीण करिंगलवार, विशाल गेडाम, संजय येनुगवार, तुषार किरमे, मरियम मिंज, मनीषा सयाम व विद्यार्थी उपस्थित हाेते.
स्काउट-गाइड जिल्हा कार्यालय, गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा आयुक्त एम. जी.राऊत यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी शांतीलाल सेता, दीपा मडावी, राजेंद्र सावरबांधे, श्रीकृष्ण ठाकरे, प्रमाेद पाचभाई उपस्थित हाेते.
महात्मा गांधी कला, विज्ञान महाविद्यालय, आरमाेरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे सचिव मनाेज वनमाळी यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी डाॅ. विजय रैवतकर यांनी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ दिली. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष सुनीता वनमाळी, उपाध्यक्ष नूरअली पंजवानी, सदस्य नामदेवराव साेरते, उमाकांत वनमाळी, अशाेक वनमाळी, नादीर पंजवानी, प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, मुख्याध्यापक के. टी. किरणापुरे उपस्थित हाेते. दरम्यान महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज व स्व. वामनराव वनमाळी यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर ठाकरे, प्रा. डाॅ.विजय रैवतकर यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. सतेंद्र साेनटक्के, प्रा. मिलिंद साळवे, सी. पी. हजारे, प्रशांत दडमल, किशाेर कुथे, सचिन ठाकरे यांनी सहकार्य केले.
राजीव गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज : प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे सचिव जेसा माेटवानी यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी प्रभारी प्राचार्य ए. जी. शिवणकर, निलाेफर शेख व कर्मचारी उपस्थित हाेते. सूत्रसंचालन प्रा. विनित ठेंगरी तर आभार प्रा. राजू शेंडे यांनी मानले.
भारतीय जनता पक्ष कार्यालय, गडचिराेली : प्रजासत्ताक दिनानिमित्त खा. अशाेक नेते यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश संघटन महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा प्रशिक्षण प्रमुख अनिल पोहनकर, ज्येष्ठ नेते नंदकिशोर काबरा, अनुसूचित जमाती मोर्चाचे डेडूजी राऊत, न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सुधाकर येनगंधलवार, गडचिरोलीचे शहर अध्यक्ष तथा न. प. पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक केशव निंबोड, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष दुर्गा काटवे, नगरसेविका रंजना गेडाम, वैष्णवी नैताम, लता लाटकर, भाजयुमोचे माजी जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे उपस्थित होते.
प्रभू सदन वाॅर्ड, अहेरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त जि. प. सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते ध्वजाराेहण झाले. यावेळी नगरसेवक शैलेश पटवर्धन, पूर्वा दाेंतुलवार, ममता पटवर्धन, राेमित ताेंबर्लावार, संताेष मंथनवार, गीता वेलादी उपस्थित हाेते. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुली व महिलांसाठी संगीतखुर्ची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.