शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात पाच आदिवासी शेतकऱ्यांची टॉवरवर चढून विरुगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 19:56 IST

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळावा, येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन देण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी माईन्स वसाहतीच्या टॉवरवर चढून विरुगिरी करीत आंदोलन सुरु केले.

ठळक मुद्देमाणिकगड सिमेंट कंपनीच्या माईन्स वसाहतीच्या टॉवरवर

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचांदूर येथून १२ किमी अंतरावर कुसुंबी गाव आहे. या गावातील आदिवासी कोलाम समाज शेती करुन पोट भरत होते. परंतु माणिकगड सिमेंट कंपनीने त्यांची शेतजमीन व गाव उठवून तिथे माईन्स सुरु केली. कंपनीने या गरीब आदिवासींना नोकरी तर दिलीच नाही. परंतु कुसुंबी-लिंगनडोह रस्त्यावर कब्जा करुन या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या व्यक्तींनाही आता अडविले जात आहे. याविरोधात पाच आदिवासी शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट कंपनीच्याच माईन्सच्या टॉवरवर चढून सोमवारी विरुगिरी केली.याविरोधात यापूवीर्ही आंदोलने झाली. निवेदनही देण्यात आले. परंतु याकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने अखेर संतप्त होऊन पाच जणांनी टॉवरवर चढून सोमवारी सकाळपासून आंदोलन सुरु केले आहे.कुसुंबी हे गाव प्रत्यक्षात व नकाशावर होते. जवळपास येथे २५ आदिवासी शेती करुन गुजरान करीत असताना माणिकगड सिमेंट कंपनीने त्यांची जमीन माईन्सकरिता घेण्यात आली. परंतु कंपनीने या गावातील जनतेचे पुनर्वसन केले नाही. मोबदला दिला नाही. कुटुंबातील एकाही सदस्याला नोकरी दिली नाही, असा आरोप कुसुंबीवासीयांकडून करण्यात आला. याकरिता अनेक आंदोलने झाली. प्रशासनाला निवेदन देण्यात आले. परंतु याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. अशातच कुसुंबी- लिंगनडोह रस्ता शासनाचा असताना कंपनीने कब्जा करुन या रस्त्यावर कंपनीने गेट लावले. ये जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबतही प्रशासनाला अनेक निवेदन देऊन आंदोलने केली. मात्र रस्त्यावरील कंपनीचे गेट काढण्यात आले नाही. अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जमिनीचा मोबदला मिळावा, येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा करुन देण्यात यावा, या मागणीसाठी कुसुंबी येथील रामदास मंगाम (४०), जयराम कुळमेथे (३२), महादेव कुळमेथे (४०), सागर येडमे (३०), गणेश सिडाम ( ३०) अशा पाच आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारी माईन्स वसाहतीच्या टॉवरवर चढून विरुगिरी करीत आंदोलन सुरु केले.

तीनही तहसीलदार घटनास्थळीकोसंबी गाव जिवती तालुक्यात आहे. आंदोलनस्थळ म्हणजे टॉवर राजुरा तालुक्यात तर पोलीस स्टेशन कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन येत असल्याने घटनेची माहिती मिळताच राजुरा, जिवती, कोरपना तालुक्याचे तहसीलदार, तलाठी व गडचांदूर पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहिपर्यंत ते आंदोलनकर्त्यांशी बोलत होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन