शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास विजेसाठी पाच हजार शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरसह निघाला माेर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 14:47 IST

कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी देसाईगंजातून माेर्चा काढला.

ठळक मुद्देदाेन ठिकाणी अडविले : पायदळ निघाल्यानंतर पाेलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी २४ जानेवारी राेजी देसाईगंजातून माेर्चा काढला. तरीही या माेर्च्याला कुरूड व काेंढाळा येथे पाेलिसांनी अडविले. शेवटी माेर्चेकरू पायदळ आरमाेरीच्या दिशेने निघाले; परंतु पाेलिसांनी प्रमुख लाेकांना ताब्यात घेत माेर्चा माेडून काढला.

कृषिपंपांना २४ तास विद्युत पुरवठा मिळावा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख (आरमाेरी विधानसभा क्षेत्र) सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शेकडो ट्रॅक्टर व मिळेल त्या वाहनाने शेतकरी देसाईगंज येथे एकवटले. त्यानंतर माेर्चेकरू गडचिरोलीच्या महावितरण कार्यालयाकडे निघाले. असता कुरूड फाट्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावून मोर्चा अडविला.

दरम्यान, शेतकऱ्यांनी कुरूड फाट्यावर दोन तास चक्काजाम केला व पायदळ निघाले. याचवेळी महावितरण कंपनीचे देसाईगंज येथील कार्यकारी अभियंता डोंगरवार यांच्यासह कुरखेडाचे कार्यकारी अभियंता मुरकुटे व देसाईगंजचे अभियंता सारवे आदींनी कोंढाळा ते आरमोरीच्यामध्ये माेर्चा थांबवून दोन तास चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही. शेवटी पाेलीसबळाने माेर्चा माेडीत काढला. मोर्चात उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, सागर मने, भूषण सातव, शैलेश चितमलवार, नगरसेवक अशोक कंगाली, अनिल मिसार, अरुण राऊत, चिंटू नाकाडे, तानाजी ठाकरे तसेच कार्यकर्ते व शेतकरी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

काेंढाळ्यात तीन तास राेखला रस्ता

वेळाेवेळी पाेलिसांनी अडविल्यानंतर कोढाळा येथेसुद्धा शेतकऱ्यांनी तीन तास चक्काजाम आंदाेलन केले. यावेळी शेतकरी खूप आक्रमक झाल्याने सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. आंदाेलनकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून सुरेंद्रसिंह चंदेल, अविनाश गेडाम, नंदू चावला,विकास प्रधान, विजय पुस्ताेडे यांच्यासह काही शेतकऱ्यांना पाेलिसांनी अटक केली.

पालकमंत्र्यांचे आश्वासन

२४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी काढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली. काही दिवसातच कृषिपंपांना २४ तास विद्युत पुरवठा केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. दरम्यान शेतकऱ्यांचा मोर्चा गडचिरोली येथे पाेहोचू नये, याकरिता आरमोरी, पाेर्ला तसेच खरपुंडी फाट्यावर चाेख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीजagitationआंदोलन