शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पाच हजार शेतकऱ्यांचे खाते एनपीए, बँकांनी कर्ज नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:24 IST

Gadchiroli : कर्जासाठी सावकाराकडे धावाधाव, उत्पादन न झाल्याने वाढली अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दुसरे कर्ज घ्यायचे असेल तर पहिल्या कर्जाची परतफेड करावी लागते. हा बँकांचा नियम आहे; मात्र मागील वर्षी कर्ज घेतलेल्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी कर्ज भरले नाही. त्यामुळे त्यांना यावर्षीच्या हंगामात कर्ज मिळाले नाही. उलट या शेतकऱ्यांना व्याज भरून द्यावे लागणार आहे.

शेतकऱ्यांची सावकाराच्या पाशातून सुटका करण्यासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. काही जुजबी कागदपत्रे सादर केल्यानंतर कर्ज उपलब्ध करून दिले जाते; मात्र दरवर्षी कर्ज मिळण्यासाठी त्याचा नियमित भरणा करणे आवश्यक आहे. सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करणे आवश्यक आहे. सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करून नवीन हंगामासाठी जूनमध्येच कर्ज उचलले आहे; मात्र १० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यांना यावर्षीचे कर्ज देण्यात आले नाही. त्यामुळे अडचण वाढली आहे. 

२५४ कोटींचे कर्ज वितरितमागील वर्षी सुमारे ३७ हजार २१७शेतकऱ्यांना २५४ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले होते. त्यापैकी जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. 

मुदत कधीपर्यंत ?जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्यांना ३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा करावा लागतो. त्यानंतर काही दिवसातच दुसऱ्या हंगामाचे कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना केवळ कर्जाची मुद्दल भरायची असते. 

कर्जमाफीचा भ्रमशासनाकडून पीक कर्ज माफ केले जाते, असा भ्रम काही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे हे शेतकरी ऐपत असूनही जाणूनबुजून कर्ज भरत नाही. परिणामी त्यांना दुसऱ्या वर्षी कर्ज मिळत नाही. बँकेकडून कर्ज न मिळाल्याने पुन्हा सावकाराच्या दारात शेतकऱ्यांना उभे राहावे लागत आहे. अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागत आहे.

शेती ही निसर्गावर अवलंबून आहे."प्रत्येक वर्षी उत्पादन होईलच याची शाश्वती राहत नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने ५० टक्के जरी कर्ज भरले तरी त्याला नवीन कर्ज उपलब्ध करावे. उर्वरित ५० टक्के रक्कम भरण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी द्यावा. त्याचे टप्पे पाडावे."- आसाराम कुंरजेकर, शेतकरी, खरकाळा

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरीbankबँक