शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

हाेळीच्या पर्वावर जिल्ह्यातील दाेन अपघातांमध्ये पाच जणांनी गमावले जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

आष्टीजवळील चंदनखेडी फाट्याजवळ बसने पीकअप वाहनाला जाेरदार धडक दिली. या धडकेत मिरची ताेडायला गेलेल्या तीन मजुरांसह वाहनचालक ठार झाला. तर १५ मजूर जखमी आहेत. हे सर्व मजूर ब्रह्मपुरी तालुक्यातील बाेडधा, हळदा, आवळगाव, डाेंगरगाव येथील आहेत. जखमी मजुरांमध्ये काही मजूर गंभीर जखमी आहेत. जखमी मजुरांवर गडचिराेली व चंद्रपूर येथील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. धडक देणारी बस अहेरी आगाराची आहे.

ठळक मुद्देशिवणी गावाजवळ दुचाकीस्वार ठार

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दाेन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एकूण १८ जण जखमी झाले आहेत. हाेळीच्या सणाचा दिवस अपघातवार ठरला आहे. यातील एक अपघात आष्टीजवळील आहे. या अपघातात ब्रह्मपुरी तालुक्यातील तेलंगणा राज्यात मिरची ताेडण्यासाठी जाणारे  मजूर ठार झाले. तर गडचिराेली तालुक्यातील शिवणीजवळच्या अपघातात कारवाफा येथील दुचाकीस्वार ठार झाला आहे. चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काॅंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.

शिवणी गावाजवळ दुचाकीस्वार ठार

गडचिराेली तालुक्यातील शिवणी गावाजवळ दुचाकी व पिकअप वाहन यांच्यामध्ये शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास धडक बसली. या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील दाेघे जखमी झाले आहेत. प्रणय चंदन साेनेवार रा. कारवाफा असे मृताचे नाव आहे. तर सुरेश माेरेश्वर साेमेवार व माेरेश्वर साेमेवार अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही जण कारवाफावरून डाेंगरगाव मार्गे चामाेर्शीकडे एमएच ३३ झेड ३३५४ क्रमांकाच्या दुचाकीने जात हाेते. दरम्यान शिवणी गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या राईसमिलजवळ एमएच २० डीई ७५३८  क्रमांकाच्या पीकअप वाहनाला धडक बसली. धडक एवढी जबर हाेती की दुचाकीची इंजिन फुटले. तसेच दुचाकी चालक जागीच ठार झाला. इतर जखमींना गडचिराेली रूग्णालयात  भरती करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच गडचिराेली पाेलीस स्टेशनचे ठाणेदार मंडलवार यांच्या नेतृत्वात पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही वाहने ठाण्यात जमा केली. पिकअप वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शाेध पाेलीस घेत आहेत. 

चंदनखेडी फाट्याजवळ मिरची ताेडणाऱ्या मजुरांवर अपघाताचा घालाआष्टीजवळील चंदनखेडी फाट्याजवळ बसने पीकअप वाहनाला जाेरदार धडक दिली. या धडकेत मिरची ताेडायला गेलेल्या तीन मजुरांसह वाहनचालक ठार झाला. तर १५ मजूर जखमी आहेत. हे सर्व मजूर ब्रह्मपुरी तालुक्यातील बाेडधा, हळदा, आवळगाव, डाेंगरगाव येथील आहेत. जखमी मजुरांमध्ये काही मजूर गंभीर जखमी आहेत. जखमी मजुरांवर गडचिराेली व चंद्रपूर येथील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. धडक देणारी बस अहेरी आगाराची आहे.

आरमाेरी मार्गावर एक दुचाकीस्वार गंभीर जखमीगडचिराेली शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या आरमाेरी मार्गावरील प्लॅटनिक ज्युबिली शाळेजवळ बाेलाेरा वाहन व दुचाकी यांची धडक झाली. हा अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात