शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत भ्रष्टाचार निवारण समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 11:13 IST

रेती वाहतूकदाराकडून पैसे लुटणे तसेच दुसऱ्या एका व्यक्तीच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांना चामोर्शी पोलिसांनी गुरूवारी अटक केली.

ठळक मुद्देलुटमारीचा आरोप रेती वाहतुकदाराकडून जबरीने घेतले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रेती वाहतूकदाराकडून पैसे लुटणे तसेच दुसऱ्या एका व्यक्तीच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या पाच पदाधिकाऱ्यांना चामोर्शी पोलिसांनी गुरूवारी अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.विवेक नारायण बारसिंगे (४७) रा.विवेक नगर चंद्रपूर, आरिफ पिरमहम्मद कनोजे (३५) रा. सुभाष वॉर्ड गडचिरोली, पंकज प्रदीप बारसिंगे (२८) रा.फुले वॉर्ड, गडचिरोली, मदन दयाळ मडावी (६०) रा.फराडा ता. चामोर्शी, कुणाल खुशालराव पेंदोरकर (२६) रा.रामनगर, गडचिरोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांकडे मिळालेल्या तक्रारीनुसार, या पाचही आरोपींनी सर्वप्रथम ७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील सगणापूर येथील विनोद लिंगय्या येगलोपवार यांच्या घरी जाऊन तू दारू विकतोस, असे म्हणत शिविगाळ केली. आम्ही कार्यक्रम घेणार आहोत त्यासाठी सात लाख रूपयांचा खर्च असून तू ३० हजार रूपये दे, अशी मागणी केली. येगलोपवार यांनी पैसे देण्यास नकार दिला असता पाचही जणांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर वरील आरोपींनी पुन्हा सगणापूर येथीलच एका महिलेच्या घराची झडती घेतली. तिच्याकडून सुद्धा ३० हजार रूपयांची मागणी केली, असे येगलोपवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी पाचही जणांविरोधात कलम ३८४, ४४८, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.दुसऱ्या एका प्रकरणात पाचही आरोपींनी चामोर्शी तालुक्यातीलच दहेगाव येथील रूपेश रामदास चलाख यांचा रेती भरलेला ट्रॅक्टर अडवून एक लाख रूपयांची मागणी केली. एक लाख रूपये न दिल्यास १ लाख ३० हजार रूपयांचा दंड ठोठावू, अशी धमकी दिली. मात्र पैसे देण्यास चलाख यांनी नकार दिला असता, त्यांना मारहाण केली आणि खिशातून १० हजार रूपये काढले, असे रूपेश चलाख यांनी तक्रारीत म्हटले आहे.दोघांच्याही तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. त्यापैकी आरिफ कनोजे व मदन मडावी हे दोघे रुग्णालयात भरती आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा