शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगड सीमेवर पाच नक्षल्यांचा खात्मा; निवडणुकीपूर्वी घातपात कट; चकमकीत जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:43 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा नक्षल्यांचा डाव उधळून लावण्यात पोलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा नक्षल्यांचा डाव उधळून लावण्यात येथील पोलिसांना सोमवारी यश आले. माओवादी व जवानांत छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात जोरदार चकमक उडाली. यात पाच नक्षल्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. चकमकीत एक जवान जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करू शकतात, ही शक्यता गृहीत धरून पोलिस अलर्ट मोडवर आहेत. छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील  कोपर्शी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना जवानांच्या दिशेने माओवाद्यांनी गोळ्या झाडल्या. जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यात पाच नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही चकमक झाली.

जवानाला हेलिकॉप्टरने  आणले गडचिरोलीत- यावेळी एक जवानही जखमी झाला आहे. जखमी जवानाला हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणले. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.- दरम्यान, मृत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेहही गडचिरोली येथे आणले आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

घनदाट जंगलाच्या आश्रयाने घुसखोरी

- माओवाद्यांविरुद्ध महाराष्ट्रासह छत्तीसगड पोलिसांच्या आक्रमक मोहिमेमुळे नक्षली सैरभैर झाले आहेत. काहींना अटक झाली, तर काही ठार झाले.- त्यामुळे नक्षली आता नेतृत्वहीन होत आहेत. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील नक्षली सीमावर्ती भागातील घनदाट जंगलाचा आश्रय घेऊन गडचिरोलीत घुसखोरी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तीन महिला, दोन पुरुषांचा समावेश

मृतांमध्ये तीन महिला व दोन पुरुष नक्षल्यांचा समावेश आहे. कोपरी जंगलात पहाटे सहा वाजल्यापासून चकमक सुरू झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत ही चकमक सुरूच होती. त्यानंतर, पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. मृत नक्षल्यांची संख्या वाढू शकते, असा अंदाज आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीChhattisgarhछत्तीसगड