शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पाच लाखांचे सागवान लठ्ठे जप्त

By admin | Updated: December 6, 2015 01:17 IST

चारचाकी वाहनाच्या माध्यमातून सागवानाच्या लठ्यांची तस्करी करणाऱ्या वाहनाला चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपूर येथे पकडून वाहनासह ४ लाख ७१ हजार ४६४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चामोर्शी : चारचाकी वाहनाच्या माध्यमातून सागवानाच्या लठ्यांची तस्करी करणाऱ्या वाहनाला चामोर्शी तालुक्यातील श्रीनिवासपूर येथे पकडून वाहनासह ४ लाख ७१ हजार ४६४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई ३ डिसेंबरच्या रात्री करण्यात आली. सागवानी लठ्ठे भरलेले वाहन चामोर्शीकडे येत असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार वन परिक्षेत्राधिकारी ए. एस. ताल्हन यांनी वन कर्मचारी व पोलीस यांच्यासह चामोर्शी-आमगाव व चामोर्शी-घोट मार्गावर पाळत ठेवली होती. दरम्यान, रात्री दीड वाजताच्या सुमारास कर्कापल्ली फाट्यावर एक दुचाकी वाहन भरधाव वेगाने येत असल्याचे दिसून आले. सदर वाहन अडवून त्याची चौकशी सुरू असताना चारचाकी वाहन पळून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हा वनाधिकाऱ्यांचा ताफा चामोर्शी मार्गाने शोध घेत होता. दरम्यान श्रीनिवासपूर गावात शोध मोहीम राबविली असता, रात्री ३ वाजताच्या सुमारास भवतोश सद्दमवार यांच्या शेतात एमएच ३३/४९९७ ही चारचाकी वाहन चिखलात फसले असल्याचे दिसून आले. येथील आरोपी पळून गेले. वाहनाच्या तपासणीदरम्यान त्यामध्ये आठ सागवानी लठ्ठे आढळून आले. ४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता गावातील पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. पकडलेल्या एमएच ३३ ई ८०१८ या दुचाकीवरील इसमांची चौकशी केली असता, मुख्य आरोपी विकासपल्ली येथील समीर शांती शील असल्याचे सांगितले. तो सुध्दा फरार झाला. जप्त केलेला सागवान माल व वाहनाची किमत ४ लाख ७१ हजार ४६४ एवढी आहे. आमगाव नियत क्षेत्राचे वनरक्षक एस. बी. झाडे यांनी चार दिवसांपासून घटनेची गुप्त माहिती काढली होती. यातील आरोपी घरामी रा. श्रीनिवासपूर व रतन अमुल्य हलदर रा. गरंजी यांना न्यायालयात हजर केले असता, ६ डिसेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक मिना व सहायक वनसंरक्षक डी. आय. तिरपुडे यांच्या मार्गदर्शनात चामोर्शीचे वन परिक्षेत्राधिकारी ए. एस. ताल्हन, क्षेत्र सहायक आर. के. जेल्लेवार, क्षेत्र सहायक एस. सी. गुरनुले, वनपाल आर. डी तोकला, वनरक्षक एस. बी. झाडे, जे. टी. निमसरकार, राठोड, मारोती मनकेवार, शामराव आदे, मनोहर वासेकर, रविंद्र अलबनकर यांनी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)