शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जाळाला मासा अडकला; मात्र युवक बुडाला

By दिगांबर जवादे | Updated: February 19, 2024 22:01 IST

साेनसरी गावाच्या शेतशिवारात तलाव आहे.

दिगांबर जवादे, गडचिराेली : मासे पकडण्यासाठी तलावात टाकलेल्या जाळाला मासा अडकला. मात्र, जाळ उचलण्यासाठी गेलेला युवक पाण्यात बुडाल्याची घटना साेमवारी सायंकाळच्या सुमारास कुरखेडा तालुका मुख्यालयापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनसरी गावात घडली. पवन शिवलाल कोडाप (२८, रा. साेनसरी), असे तलावात बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

साेनसरी गावाच्या शेतशिवारात तलाव आहे. या तलावात पवन काेडाप व शुभम कवडो या युवकांनी मासे पकडण्यासाठी जाळे टाकले हाेते. सायंकाळच्या सुमारास दाेघेही जाळे उचलण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरले. मात्र, पवनची अचानक प्रकृती बिघडल्याने ताे पाण्यात पाेहू शकला नाही. ताे एकदम पाण्यात बुडाला. साेबत असलेल्या शुभमने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आले नाही. शुभमने घडलेली घटना गावात जाऊन सांगितली. गावकऱ्यांनी तलावात पवनचा शाेध घेतला, मात्र ताे आढळून आला नाही. मात्र, जाे जाळ काढण्यासाठी पवन तलावात उतरला त्या जाळाला एक मासा अडकला हाेता. साेमवारी सायंकाळी अंधार पडल्याने शाेधमाेहीम थांबवण्यात आली आहे. पुन्हा मंगळवारी शाेधमाेहीम राबवली जाईल, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात