गडचिरोली : नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलाजी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी घेण्यात आलेल्या मिनी मॅरॉथॉन स्पर्धेत रिंकू गुरनुले, शंतनू बोरकर, गीता वाटगुरे, मधुकर चापले यांनी वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते पारितोषिक देऊन समन्मानित करण्यात आले. सकाळी मिनी मॅरॉथॉन स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, आ. कृष्णा गजबे, प्रकाश पोरेड्डीवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नाना नाकाडे, सुधाकर येनगंधलवार, रवींद्र ओल्लालवार, नामदेव मसराम, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, डॉ. बळवंत लाकडे, संजय गुप्ता, प्रकाश गेडाम, खुशाल वाघरे, मनिष शेटे, प्राचार्य डॉ. प्रवीण पोटदुखे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रागिनी पाटील, आभार प्रा. उज्वला म्हशाखेत्री मानले. (जिल्हा प्रतिनिधी)
गुरनुले, बोरकर, वाटगुरे, चापले मॅरॉथॉन स्पर्धेत प्रथम
By admin | Updated: January 17, 2015 22:58 IST