शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

अहेरीतील उपजिल्हा रुग्णालयाला आग; रुग्णांची धावपळ, साहित्य जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 15:40 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात जीवित हाणी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे जवळपास ५० लााखांचे साहित्य जळून खाक झाले. 

अहेरी (गडचिरोली)  : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वपूर्ण शहर आणि आत्राम राजघराण्याचे मुख्यालय असलेल्या अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. यात जीवित हाणी झाली नसली तरी टेलिमेडिसीन रुममधील संगणक, सोनोग्राफी मशिन, एअर कंडिशनर असे जवळपास ५० लााखांचे साहित्य जळून खाक झाले. विद्युत तारांमधील शॉर्ट सर्किटने ही आग लागली. ५० खाटांच्या या रुग्णालयात जवळपास ७० रुग्ण भरती होते.  टेलिमेडिसीन रुममधील  विद्युत तारांनी पेट घेतल्याचे लक्षात येताच सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले. महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी माहिती मिळताच विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर रुग्णालयातील अग्निशमन यंत्रांनी आणि टाकीतील पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. विशेष म्हणजे आग विझविण्यासाठी अहेरी नगर पंचायतची अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरली. सात महिन्यांपूर्वीच नगर पंचायतला ८५ लाख रुपयांच्या खर्चातून अग्निशमन वाहन देण्यात आले. मात्र प्रशिक्षित कर्मचारीच नसल्यामुळे हे अग्निशमन वाहन शोभेचे ठरले. ही आग विझविण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होऊ न शकल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.रुग्ण भरती असलेल्या दोन्ही वॉर्डमध्ये ही आग पसरली नाही. मात्र अंतर्गत भागात सर्वत्र धूर पसरल्याने भरती असलेल्या रुग्णांची तारांबळ उडाली. त्यांना दुस-या एका वॉर्डमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहे. रुग्णालयाची वायरिंग खूप जुनी आहे. मशिनरी आधुनिक लागल्या असल्यामुळे त्याअनुषंगाने वायरिंगमध्ये योग्य तो बदल करणे गरजेचे आहे. वायरिंग दुरूस्तीसाठी यापूर्वीच जिल्हा शल्य चिकित्सकांकडे निधीची मागणी केली आहे. मात्र निधी मिळाला नसल्यामुळे दुरूस्ती होऊ शकली नाही.- डॉ.कन्ना मडावी, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अहेरी

टॅग्स :fireआग