गडचिरोली : अचानक लागलेल्या आगीत घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना आज शनिवारला सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कुरूड येथे घडली. या घटनेमुळे सुनीता रामदास प्रधान यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. प्राप्त माहितीनुसार सुनिता प्रधान ही महिला स्वयंपाक झाल्यानंतर धान कापणीच्या कामाची मजुरी घेण्यासाठी गावातीलच एका शेतकऱ्याच्या घरी गेली होती. घरी कुणी नसताना अचानक प्रधान यांच्या घराला आग लागली. घरी कुणी नसल्यामुळे सदर आग विझविण्यासाठी विलंब झाला. त्यामुळे या आगीत प्रधान यांचे संपूर्ण धान्य, जीवनावश्यक वस्तू व साडेपाच हजाराची रोख रक्कम जळून खाक झाली. सदर घटनेची माहिती मिळताच देसाईगंजचे मंडळ अधिकारी के. टी. शेंडे, कुरूडचे तलाठी हेमंत रामटेके यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आगीच्या घटनेचा पंचनामा केला व तहसीलदाराला अहवाल सादर केला. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी प्रधान कुटुंबीयांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
आगीत घर जळून खाक
By admin | Updated: December 6, 2014 22:48 IST