शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

आलापल्लीत गोदामाला आग

By admin | Updated: May 6, 2017 01:15 IST

आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली.

५० लाखांचे नुकसान : कपडे, बांगड्या, चपला जळून खाक; पंचनामा करून मदतीची मागणी प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी/आलापल्ली : आलापल्ली येथील आठवडी बाजारात दुकानदार ठेवत असलेल्या सामानाच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत जवळपास १० दुकानदारांचे साहित्य जळून खाक झाले आहेत. यामध्ये जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आलापल्ली येथील आठवडी बाजार परिसरात पांडे लाईनमन यांच्या मालकीची चाळ आहे. सदर चाळ आलापल्ली येथील काही दुकानदारांनी दुकानातील सामान ठेवण्याासठी भाडे तत्वावर घेतली होती. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत तर्फे गोदामाच्या अगदी मागच्या बाजुला असलेल्या कचऱ्याच्या ढिगांना आग लावली होती. सदर आग गोदामापर्यंत पोहोचली व गोदामाला आग लागली, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या गोदामामध्ये विद्युत पुरवठा नाही. त्यामुळे शार्टसर्कीटने आग लागण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आग लागल्याची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच पोलीस उपनिरिक्षक कोळेकर, वाहतूक पोलीस हवालदार संतोष मंथनवार, पोलीस हवालदार संतोष पवार यांनी बाजारवाडीतील युवकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तासाने आग आटोक्यात आली. तोपर्यंत गोदामातील सामान जळून खाक झाले. आग लागल्यावर ग्रामपंचायतमधील एकही पदाधिकाऱ्याने घटनास्थळी हजेरी लावली नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. या ठिकाणी सामान ठेवणारे दुकानदार विविध बाजार फिरून दुकान थाटत होती. या दुकानदारांवर आता उपासमारीची पाळी आली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आलापल्लीचे तलाठी एकनाथ चांदेकर यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. आलापल्ली उपविभागात अग्नीशमन दलाचे वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे या परिसरात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. ज्या नागरिकांचे सामान जळाले आहे, ते नागरिक हातावर आणून पानावर खाणारे आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. या दुकानदारांचे झाले नुकसान स्वप्नील शिंदे यांचे चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. गणेश सिकदर यांचे ४.५ लाख, जीवन सिकदर यांचे ३ लाख, नारू आईलवार यांचे ३ लाख, जयश्री कुमरे यांचे ३ लाख, पद्मावती मडावी यांचे १.५ लाख, अन्नपूर्णा समुद्रकोलावार यांचे दोन लाख, अशोक बंडावार व संतोष बंडावार यांचे चार लाख, पद्मा नाईलवार यांचे चार लाख, लक्ष्मीबाई मित्रावार यांचे चार लाख, पुष्पा सिकदर यांचे चार लाख, अशोक दुर्गे यांचे दोन लाख, उमा गुडलवार यांचे तीन लाख, श्रीनिवास रामगिरवार यांचे १.५ लाख, भास्कर राऊत यांचे एक लाख, किशन रामटेके यांचे १.५ लाख, छत्रपती खोब्रागडे यांचे एक लाख, फिरोज शेख १.५ लाख, मदनाबाई रामगिरी एक लाख, हयद खान यांचे दोन लाख, श्रीनिवास मनिषा यांचे ५० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कपडे, दागिणे, भांडे, चपल, बांगड्या आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.