तलांडी परिवाराचे दातृत्व : तीन हजार रूपये व धान्य वितरणसिरोंचा : मागील आठवड्यात अमडेली गावातील दोन घरांना भीषण आग लागून त्या कुटुंबाचे सर्वस्व आगीत नष्ट झाले होते. या दोन आगग्रस्त कुटुंबांना माजी आमदार तथा विद्यमान जि.प. सदस्य पेंटारामा तलांडी व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सगुना तलांडी यांच्याकडून आर्थिक मदत देण्यात आली. अमडेली गावातील मासा कुल्हे गावडे व कारे कुल्हे गावडे या दोन भावांच्या घराला आग लागली. हे दोन्ही कुटुंबीय कामावर गेल्याने आगीने भीषण रूप धारण करून त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले होते. कारे गावडे यांचे ४६ हजार रूपये व मासा गावडे यांचे २५ हजार रूपये जळून खाक झाले. त्यांच्या घरातील कोणतीही वस्तू आगीतून वाचली नाही. बेघर झालेल्या या आगग्रस्त कुटुंबाला माजी आमदार पेंटारामा तलांडी व सगुना तलांडी यांनी दोन पोते तांदूळ, कापड, तीन हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी सिरोंचा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रत्नमाला मासनुरी, विविध सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष राहिला पापय्या, स्वस्त धान्य दुकानदार संघाचे तालुकाध्यक्ष देवीदास बोधनवार, बानय्या आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आगग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत
By admin | Updated: April 17, 2016 01:15 IST