शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अन् त्यांनी वाघाच्या तावडीतून शेतकऱ्याला सुखरूप साेडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 5:00 AM

दबा धरून बसलेल्या वाघाने बाबूराव यांच्यावर झडप घातली. बाबूराव उभे झाले असल्याने त्यांची डाव्या पायाची मांडी वाघाच्या जबड्यात सापडली. वाघाने हल्ला केल्याचे पाहताच जवळच असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड करत वाघावर काठ्या उगारल्या. त्यामुळे घाबरून वाघाने बाबूराव त्यांना सोडून जंगलाकडे पळ काढला. या हल्ल्यात बाबूराव यांच्या मांडीला वाघाच्या दातांचे व्रण पडून जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : आपली गुरे चारण्यासाठी जंगलात गेेलेल्या शेतकऱ्यावर एका पट्टेदार वाघाने झडप घातली; पण सोबत असणाऱ्या इतर शेतकऱ्यांनी वाघाच्या तावडीतून त्या शेतकऱ्याला सोडवत जीवनदान मिळवून दिले. हा थरार मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून १२ किलोमीटरवर असलेल्या मारकबोडीजवळच्या जंगलात घडला.बाबूराव ताेदूरवार (६०) रा.मारकबाेडी असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, बाबूराव यांच्यासह गावातील इतर पाच शेतकरी गावाजवळ असलेल्या वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) जंगलात बैलांना चारण्यासाठी नेले हाेते. बैलांना चरण्यासाठी साेडून सहाही जण एका झुडुपाजवळ सावलीत बसले हाेते. काही वेळानंतर बाबूराव हे उठून जाऊ लागले. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने बाबूराव यांच्यावर झडप घातली. बाबूराव उभे झाले असल्याने त्यांची डाव्या पायाची मांडी वाघाच्या जबड्यात सापडली. वाघाने हल्ला केल्याचे पाहताच जवळच असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरड करत वाघावर काठ्या उगारल्या. त्यामुळे घाबरून वाघाने बाबूराव त्यांना सोडून जंगलाकडे पळ काढला.या हल्ल्यात बाबूराव यांच्या मांडीला वाघाच्या दातांचे व्रण पडून जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गडचिरोलीपासून अवघ्या १२ किलोमीटरवर ही घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ