गडचिरोली : कोरची पंचायत समितीचे शाखा अभियंता अरविंद चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी शाखा अभियंता अरविंद चव्हाण यांना निलंबित केले आहे. पंचायत समिती गडचिरोली अंतर्गत शाखा अभियंता या पदावर कार्यरत असताना अरविंद बहादुरसिंग चव्हाण यांनी सेवाकाळात आपल्या पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने अवैध मार्गाने आपल्या सेवेतून मिळणाऱ्या शासकीय उत्पन्नापेक्षा ९ लाख ४९ हजार ७९ रूपये कमविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रोशन यादव व गडचिरोली पोलीस ठाण्याच्यावतीने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलम १३ (१) (ई), १३ (२) नुसार गुन्हा नोंदविला आहे. अरविंद बहादूरसिंह चव्हाण यांनी त्यांच्या ताळेबंधावरून अधिकची संपत्ती धारण केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून निष्पन्न झाले होते.
अखेर शाखा अभियंता अरविंद चव्हाण निलंबित
By admin | Updated: March 2, 2015 01:16 IST